शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

देशात लोकशाहीविरोधी वातावरण वाढतंय

By admin | Updated: November 18, 2016 23:53 IST

दक्षिणायन संवाद यात्रा : लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चेतील सूर

 कणकवली : देशात दिवसेंदिवस लोकशाही विरोधी वातावरण वाढत आहे. धार्मिक उन्माद चालू असून त्या विरोधात आवाज उठविण्यासाठीच दक्षिणायन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेला गृहीत धरून राजकीय व्यक्ती सत्ता राबवित आहेत. तसेच सत्ताधारी धार्मिक उन्माद वाढविणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, असा सूर सामाजिक कार्यकर्ते, नामवंत लेखक तसेच पत्रकारांंच्या चर्चेत उमटला. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी देशातील असहिष्णू वातावरणाविरोधात ‘दक्षिणायन यात्रा’ देशात सुरू केली आहे. त्याअंतर्गत बहुभाषिक राष्ट्रीय दक्षिणायन संमेलन १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मडगाव येथे होत आहे. यात सहभागी होणाऱ्यांची संवादयात्रा मुंबई ते गोवा अशी आयोजित करण्यात आली आहे. या संवाद यात्रेतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, समीक्षक मंदार काळे, पत्रकार युवराज मोहिते, यूथ मोटीव्हेटर आशुतोष शिर्के, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर आदींनी समाजयात्रेच्या निमित्ताने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात नागरिकांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी युवराज मोहिते म्हणाले, देशात लोकशाही विरोधी आज जे वातावरण निर्माण झाले आहे; त्याविरुद्ध लोकांना बोलावेसे वाटत आहे. त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विशिष्ठ विचार लादला जाण्याच्या प्रकारातून माणसाच्या मूलभूत हक्कांवरच गदा येत आहे. अनेक निर्बंध लादले जात आहेत. विकासाचे चित्र उभे करण्यात येत असले तरी दुसऱ्या बाजूला माणसांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जात आहे. यावेळी मोहिते यांनी, धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे वर्चस्व ठेऊन माणसालाच दाबले जात आहे. त्यामुळे बुवाबाजी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. येथे वेगळा विचार करणाऱ्याला गुन्हेगार ठरविण्यात येत आहे. यातूनच डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सगळ्यामागे राजकारण आहे. हे आता विचार करणाऱ्या वर्गाने समजून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मंदार काळे, आशुतोष शिर्के, राजन इंदुलकर आदींनीही यावेळी विचार मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. शमिता बिरमोळे, इंद्रजीत खांबे, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, शशिकांत कांबळी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)