शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...तर नगरसेवकपदाचा राजीनामा द्या

By admin | Updated: October 12, 2015 00:56 IST

मतदारांकडून निषेध : प्रभागात आयोजित बैठकीत व्यक्त केल्या भावना

कणकवली : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून दिलेल्या चार उमेदवारांना तेथील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते. मात्र, या मतदारांच्या भावनांचा विचार न करता ८ आॅक्टोबरला झालेल्या नगराध्यक्षा निवडीत अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी गद्दारी करीत आपल्याच प्रभागातील नगरसेविकेच्या विरोधात मतदान केले. हा आमचा अपमान असून याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्या स्वाभिमानी असतील तर त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील. तसेच संदेश पारकर जी निशाणी देतील, त्याच्यावर पुन: निवडून येऊन दाखवावे, अशा संतप्त भावना व्यक्त करणारा ठराव प्रभाग १ मधील मतदारांनी रविवारी झालेल्या बैठकीत केल्याची माहिती नगरसेवक किशोर राणे यांनी दिली.कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडींचे पडसाद अजूनही कणकवली शहरात उमटत आहेत. रविवारी येथील मातोश्री मंगल कार्यालयात अ‍ॅड. प्रज्ञा खोत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील मतदारांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच काही ठरावही घेण्यात आले. यावेळी नगरसेवक किशोर राणे, गौतम खुडकर, नगरसेविका सुविधा साटम, विठ्ठल देसाई, संदीप राणे, अजय गांगण, भूपेश राणे, शांताराम राणे, मनोहर राणे, खेमाजी राणे, सोनू देसाई, विजय पवार, सोनू कामतेकर, जावेद शेख, संदीप घाडी, नितीन मेस्त्री, बाबूराव कांबळी, महेंद्र जाधव, चारुदत्त साटम, राजन परब यांच्यासह सुमारे शंभर मतदार उपस्थित होते.या बैठकीनंतर नगरसेवक किशोर राणे यांनी बैठकीत चर्चा झालेल्या मुद्यांबाबत तसेच घेतलेल्या ठरावांबाबत पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले, कणकवली ग्रामपंचायत असताना सरपंच म्हणून पुतळोजी राणे यांना संधी मिळाली होती. सन २0१0 मध्ये मला उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती, तर त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून अ‍ॅड. खोत यांना संधी देण्यात आली होती. मात्र, या बाबींचा खोत यांना विसर पडला आहे. ग्रामीण भागाला पुन्हा प्रतिनिधित्व देण्यासाठी नारायण राणे यांनी सुविधा साटम यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती. परंतु, खोत यांनी त्यांच्याविरोधी मतदान केले. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ चारही उमेदवारांनी एकत्रितपणे फोडून विकासाचे वचन मतदारांना देवासमोर दिले होते. त्यातीलच एका नगरसेविकेने सहकाऱ्यांबरोबरच मतदारांशी गद्दारी केली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी पडद्यामागून कूटनीतीचा अवलंब केला. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार यानंतर कधीही त्यांना साथ देणार नाहीत. तसेच आपला अपमान सहन करणार नाहीत, अशा भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्या असल्याचे राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)आपल्या प्रभागातील मतदारांना विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे शहरातील लोकांना सध्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो आहे.ज्या कार्र्यकर्त्यांनी निवडणुकीत त्यांचा प्रचार केला होता, त्यांनाही त्या ओळखत नाहीत. किरकोळ कामांसाठी अनेकवेळा नगरपंचायत कार्यालयात त्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हे योग्य नव्हे. इतर तीन नगरसेवकांनी आपली जनसेवा सुरु ठेवली आहे. मात्र, निवडून आल्यानंतर तीन ते चारच वेळा खोत यांनी प्रभागाला भेट दिली असेल. त्यामुळे त्यांना येथील समस्या कशा समजणार ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.