शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाचा मृतदेह तिलारी डाव्या कालव्यात आढळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 14, 2023 18:09 IST

दोडामार्ग सुरूचीवाडी येथील घटना 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मॉर्निंग वॉक साठी  घराबाहेर पडलेल्या वयोवृध्दाचा मृतदेह सुरुचीवाडी येथील तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात रविवारी आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरेश केशव गवस (७२ रा.कसई-धाटवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोडामार्ग पोलिसांनी सध्यातरी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.  सुरेश गवस हे मूळ पिकुळे गावचे रहिवासी ; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कसई-धाटवाडी येथे घर बांधून आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. दरदिवशी त्यांना मॉर्निंग वॉक करण्याची सवय होती. त्यासाठी ते नेहमी कालव्याच्या रस्त्याने जात असत. नेहमीप्रमाणे रविवारीही ते सकाळीच मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली .याचदरम्यान सुरुचीवाडी येथे कालव्यात रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला पाण्यात तरंगत असलेला मृतदेह दिसला. 

याबाबतची माहिती त्याने कसई-दोडामार्ग चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना दिली. त्यांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर तोपर्यंत गवस यांचे कुटुंबीयही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी ओळख पटवून घेतली असता सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या सुरेश गवस यांचाच तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर मृतदेह कालव्याबाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सध्या तरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास दोडामार्ग पोलिस करीत आहेत.