शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा बुरखा कुडाळच्या जनतेने फाडला

By admin | Updated: April 20, 2016 01:13 IST

जयेंद्र परूळेकर : पालकमंत्र्यांवर टीका ; यापुढील निवडणुकीतही जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहणार

सावंतवाडी : एका पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असतानाही कुडाळात युतीला जनतेने नाकारले आहे. याचाच अर्थ या जिल्ह्याने पुन्हा नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारले असून, यापुढच्या निवडणुकांमध्येही जनता काँगे्रस आघाडीच्याच पाठीशी राहणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाचा बागुलबुवा करून निवडून आले. मात्र, निवडून आल्यावर जनतेने त्यांना ओळखले असल्यानेच कुडाळमधून त्यांना नाकारले, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.कुडाळात जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत देत सत्तेवर आणले. जनतेला विकास कोण करू शकतो, हे कळले आहे. काही उमेदवार आमचे थोडक्या मतांनी पडले आहेत. असे असले तरी जनतेने जो कौल दिला, तो आम्हाला मान्य असून, जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे यातून दिसून येत आहे.अनेक प्रकल्प युती शासनाच्या काळात बंद आहेत. हे जनतेने ओळखले आहे. यांचे आमदार टक्केवारीतच गुंतले आहेत. त्यामुळे दर्जेदार विकास कामेही होत नाहीत, असा आरोपही यावेळी डॉ. परूळेकर यांनी केला आहे.कुडाळात युतीचा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, आता युतीच्या नेत्यांना कुडाळात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही. नेहमी केसरकर काँग्रेसवर दहशतवादाचा आरोप करीत राहिले. दहशतवादाचा आरोप करून जनतेला त्यांनी फसवले. पण पालकमंत्री झाल्यावरही जनतेत जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने पूर्णत: शिवसेनेच्या कारनाम्यांना वैतागली असून, त्यांनी आपले उत्तर मतपेटीतून दाखवून दिले आहे. यापुढच्या निवडणुकांमध्येही जनतेच्या अपेक्षित कामांना न्याय देऊ. या जिल्ह्याचा विकास राणेच करू शकतात, हे जनतेला आता कळले असून, जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)