शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

पावसाच्या तोंडावर मसल्याचा तडका

By admin | Updated: June 3, 2015 01:25 IST

महिलांची लगबग सुरू : वर्षभराच्या बेगमीची जोरदार तयारी; गावठी व घाटी मिरचीचे तिखट करण्याचा धरला जोर

बाळकृ ष्ण सातार्डेकर - रेडी -जिल्हाभरात विशेषत: ग्रामीण भागामध्ये पावसाळ््यात गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले तयार करण्याच्या कामाने सध्या जोर धरला आहे. जेवणासाठी वर्षभरासाठी लागणारा चवदार मसाला बनविण्यासाठी रेडी पंचक्रोशीसह भागातील गृहिणींची धावपळ चालली आहे; परंतु मसाल्यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांची आवक कमी झाल्याने या पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना मसाला सामानाची जमवाजमव करताना कसरत करावी लागत आहे.सध्या मे महिन्याच्या सुटीत चाकरमानी वर्ग गावात दाखल झाल्यानंतर गावठी मिरचीचा गरम व हिरवा मसाला येथे उत्कृष्ट बनवून मुंबई येथे आपल्या दररोजच्या आहारात वापरण्यासाठी नेत आहेत. ग्रामीण भागात विशेषत: कोकणपट्टी परिसरात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाळ्याची बेगमी म्हणून या परिसरातील तयार केलेली गावठी मिरची व घाटमाथ्यावरून आलेली घाटी मिरची कुटून उत्कृष्ट तिखट गरम व हिरवा मसाला तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. गावठी मिरची बनविण्याची पद्धतग्रामीण भागात फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान गावठी मिरचीचे पीक घेतले जाते. यासाठी शेतात नांगरणी करून उत्कृष्ट वाफे बनवावे लागतात. चांगल्या प्रतीच्या बिया रुजत घालून त्यांना योग्य प्रमाणात खतपाणी घालावे लागते. ठरावीक वेळेत गावठी मिरचीची लागवड झाल्यानंतर मिरच्या कुटून जमा करून त्यांचे देठ काढले जातात. त्यानंतर मिरच्या व्यवस्थित सुकवून विक्रीसाठी आणल्या जातात. सध्या आरोंदा, शिरोडा परिसरात मिरची विक्री व्यावसायिक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. गावठी मिरचीचा भाजलेला मसाला व हिरवा मसाला सर्वसामान्य घर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्कृष्ट, चवदार सांबार, आमटी, उसळ, कुरमा, पालेभाज्यांमध्ये वापरला जातो. तसेच हिरवा मसाला उत्कृष्ट चवदार मच्छी कडी, मासे भाजणे (फ्राय) यासाठीही वापरला जातो. सध्या रेडी, शिरोडा, आरोंदा, आसोली, टांक, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, धाकोरा, मातोंड, तळवडे, अणसूर या परिसरातील गावठी लाल मिरची व हिरव्या मसाल्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, गडहिंग्लज, बेळगाव, कारवार व गोवा राज्यातील व्यापारी मिरचीसह मसाल्याचे पदार्थ स्थानिक आठवडा बाजारपेठेत विक्री करत असल्याचे दिसत आहे. तसेच कांदा, नारळ, सुकी, मच्छीसह पावसाळ्यासाठी लागणाऱ्या अन्य वस्तूंच्या किमती महागल्याने सर्वसामान्यांना पावसाळी बेगमीसाठी मसाला खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य गृहिणीला मसाला करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.गरम चवदार मसाला बनविण्यासाठी चांगल्या लाल मिरचीसोबत धणे, जायफळ, खसखस, काळी मिरी, जिरे, लवंग, हळद, जायपत्री, रामपत्री, दालचिनी, शायजिरे, मसाला वेलची, तमालपत्री, दगड फुल, सफेद मिरी या पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच गावठी मिरचीच्या उत्पादनामध्ये काम करतेवेळी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने यापुढील काळात गावठी मिरचीच्या दरात भरमसाठ वाढ होणार आहे, असा अंदाज या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावठी लाल मिरचीपासून बनविलेल्या गरम मसाल्यापासून आमटी, उसळ, सांबार, कुरमा चवदार होतो. त्यामुळे गावठी मिरचीला अधिक पसंती मिळते. मसाले पदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य गृहिणीला मसाला बनविणे महाग होत आहे. - स्रेहा सातार्डेकरगृहिणी, रेडी-म्हारतळेवाडीग्रामीण भागात गावठी मिरची करतेवेळी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. गावठी मिरचीची देशात वविदेशात निर्यात झाल्यास या व्यवसायाला चालना मिळून शेतकरी, बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल. - प्रसाद रेडकरव्यावसायिक, रेडी-म्हारतळेवाडी मिरची दर (प्रति किलो) घाटमाथ्यावरील काश्मिरी मिरची२०० रुपये तिखट गुंडर मिरची१२० रुपयेलाल बेडगी मिरची१६० रुपयेगावठी लाल मिरची३०० रुपयेलवंगी मिरची१५० रुपयेमसाला कांडप दर२५ रुपये