शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढल्याने तणाव

By admin | Updated: August 8, 2014 00:39 IST

सावंतवाडीतील घटना : पालक-शाळा वाद ; हमरातुमरीमुळे तणावाची परिस्थिती

सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या वाढीव फी विरोधात आवाज उठविल्याने वासिम शेख यांच्या मुलाला गेले आठवडाभर शाळेतून बाहेर काढले जात असल्याच्या निषेधार्थ पालकांनी सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ठिय्या मांडला. तसेच संचालक व शाळेच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. अखेर सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू शाळेत दाखल होत याप्रकरणी शुक्रवारी तोडगा काढू, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान, या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पण, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.सेंट्रल इंग्लिश स्कूलचा सीनिअर केजीचा विद्यार्थी सनम वसिम शेख हा गेली दोन वर्षे सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. यावर्षी त्याला सिनियर केजीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात वाढीव फी विरोधात काही पालकांनी सह्यांची मोहीम राबविली. त्यात वसिम शेख यांनीही यावर सही केली. त्याचाच राग ठेवून या शाळेमधील स्थानिक समितीने वसिम शेख यांच्या मुलाला गेले आठवडाभर बाहेर बसवून ठेवले. याबाबत काही पालकांनी संस्थेच्या काही संचालक तसेच शिक्षकांना जाब विचारला. मात्र, यावर तोडगा निघाला नव्हता. गुरूवारी सनम शेख या विद्यार्थ्याला बाहेर काढले आणि शाळेच्या अंगणात खुर्चीवर बसवून ठेवून पालकांना बोलावले. त्यावेळी तेथे पालक दाखल झाले आणि त्यांनी जोपर्यंत माझ्या मुलाला शाळेत प्रवेश दिला जात नाही. तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेविका अफरोझ राजगुरू, अ‍ॅड. सनम खोजा, डायमंड शेख आदींनी शिक्षकांना जाब विचारला. मात्र, तेही यावर उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. यावेळी तेथे संचालिका निलोफर बेग या दाखल झाल्या, पण त्यांनाही पालकांनी धारेवर धरले. यावेळी पालक व बेग यांच्यात हमरातुमरी झाल्याने बेग निघून गेल्या.अखेर हा वाद चिघळत जात असतानाच संस्थेचे काही पदाधिकारी उद्योगमंत्री नारायण राणे यांना भेटले. त्यांनी पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांना लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते संस्था पदाधिकाऱ्यांच्या बाजूने जमा झाले होते. तर पालकही तेवढ्याच संख्येने आले होते. दोघेही ऐकामेकांवर जोरदार तोंडसुख घेत होते. पोलिसांची फौज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे संकेत देत या वादावर शुक्रवारी रितसर तोडगा काढू. तुम्ही सर्वांनी शांत व्हा, अशी विनंती दोन्ही बाजूना पोलिसांनी केली. आणि या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, गुरू पेडणेकर आदीसह पालक उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक व्ही. एन. चौबे, पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आदी अधिकाऱ्यांसह संतोष नांदोस्कर, सूरज तांडेल, अमोल सरंगळे, अमर नारनवर, दाजी सावंत आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)