शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कसे जगायचे?, न रस्ता, न पाणी

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विनायक राऊत यांच्या गावची हाक : खासदारांनी तळगाव पेडवेवाडीत मुलभूत सुविधा पुरवाव्यात

मालवण : तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी (फातरीचे टेंब) गावाला भारत स्वतंत्र काळातही रस्ता व पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे हे गाव खासदार विनायक राऊत यांचे असून पेडवेवाडीतील ग्रामस्थांना खासदारांनी पाणी, रस्ता व इतर सुविधांची पूर्तता करावी व शेकडो वर्षांची मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. मात्र सुविधांची वानवा येथे नेहमीच दिसून आली आहे. २०० हून अधिक लोकवस्तीच्या वाडीवर रस्ताच पोहचला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच आहे. जलस्वराजच्या नावाखाली लोकवर्गणीतून बांधलेली विहीर जमीन मालक खासगी ठरवून पाणी देत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा सोडाच दुचाकी जायला रस्ता नाही. शासनाला निवेदने, पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेतमळ्यातून पेडवेवाडीत यायला अर्धा ते पाऊन किमी पायपीट करावी लागते. पूर्वी रुंद असलेला हा मार्ग आता एका माणसालाही चालण्यासाठी जिकरीचा बनला आहे. गावातील वृद्ध, आजारी अथवा गरोदर स्त्रीला दवाखान्यात नेणेही मुश्किल आहे. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती आणतानाही अनेक विघ्ने आतापर्यंत आली आहेत. या मार्गावरून चालताना काही वषार्पूर्वी लक्ष्मण शिरोडकर हे वृद्ध पडले. त्यात त्यांना आपला अंगठाही गमवावा लागला. आज ते दोन पायावर उभेही राहू शकत नाही अशी स्थिती गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी येतात मात्र या समस्यांमुळे तेही राहत नाहीत. त्यांची बायका-मुले येण्यास नकारच देतात. अशी व्यथा रामदास शिरोडकर व वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)अनेक कुटुंबीयांनी केला गावालाच रामरामपेडवेवाडी येथील काही कुटुंबे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. येथील कुटुंबे समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन जगताना दिसत आहेत.तर अनेक कुटुंबांनी वाडीत रस्ता, पाणी तसेच इतर सुविधा नसल्याने गाव सोडले देखील आहे. गावाला शिवराम दळवींच्या रूपाने आमदार, दत्ता दळवींच्या रूपाने मुंबईचे महापौर लाभले. त्यांच्याकडे हजारो वेळा निवेदने दिली मात्र त्यांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत. ग्रामपंचायतीचे आडमुठे धोरण सरपंच आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार यामुळेच गावचा विकास झालेला नाही.याबाबत खासदार विनायक राऊत यांनी लक्ष घालून गावला स्ता व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.