शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची तहसीलमध्ये ठाण

By admin | Updated: June 10, 2016 00:15 IST

मालवणमधील प्रकार : प्रलंबित दाखले वितरणाची वैभव नाईकांची मागणी

मालवण : मालवण तहसील कार्यालयात इंटरनेट, जनरेटर सुविधा कोलमडल्याने विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे पालक वर्गाने केली. या पार्श्वभूमीवर गुरूवारी आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालय येथे ठाण मांडून बंद यंत्रणा कार्यान्वित करत विद्यार्थ्यांचे ९८ दाखले वितरीत करण्याची नोंद महसूल प्रशासनामार्फत केली आहे.दरम्यान, विविध जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर स्वरूपाचे हे ९८ दाखले पुढील कार्यवाहीसाठी गुरुवारी सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले असून लवकरच ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसात विविध ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले वितरीत व्हावेत यासाठी महसूल प्रशासनाने गतिमान कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.गेले काही दिवस विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची होणारी परवड लक्षात घेता आमदार नाईक यांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे उपस्थिती दर्शवली. रखडलेल्या दाखल्याबाबत नायब तहसीलदार जी. के. सावंत, एस. पी. खडपकर, शुभांगी चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी तहसील कार्यालयाकडे विद्यार्थ्यांचे तब्बल २९१ दाखले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. वारंवार खंडित होणारी इंटरनेट सुविधा, कमी दाबाचा व खंडित वीज पुरवठा, बंद जनरेटर अशा अनेक कारणांमुळे दाखले वितरीत होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.विविध दाखल्यांसाठी आजही मोठ्या संख्यने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बीएसएनएल व वीज कर्मचाऱ्यांना बोलावून इंटरनेट व वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात जो पर्यंत जास्तीत विद्यार्थ्यांच्या दाखले नोंदीची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयात ठाण मांडण्याची भूमिका आमदार नाईक यांनी घेतली. सायंकाळी जातीचे दाखले ७१ व नॉन-क्रिमिलेअर २७ दाखले असे ९८ दाखले प्रांताधिकारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)