शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तटकरे, जाधवांचा आज कोणावर हल्लाबोल?

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

रत्नागिरी दौरा : नगर परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची झुंज शिवसेनेशी

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांच्या १ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव हे रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीची खरी झूंज शिवसेनेबरोबर असल्याने हे दोन्ही नेते कोणावर हल्लाबोल करणार, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्या सायंकाळी शहरातील राजीवडा भागात होणाऱ्या प्रचार मेळाव्यात तटकरेंबरोबरच आमदार भास्कर जाधव हे प्रचाराच्या धुरळ्यात कोणाची घुसमट करणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व प्रभाग ४मध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रीयेची तयारी पूर्ण झाली असून, दोन्ही प्रभागातील एकूण १३ केंद्रांवर मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०१४मध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला होता. मात्र, पक्षांतरबंदी कायद्याचा भंग झाल्याने या चारही नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्यानंतर या चार जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सेना, राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी ४ , मनसेचे दोन व अपक्ष एक असे एकूण १५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वी सेनेत असलेले उमेश शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेने उमेश शेट्ये यांना जेरीस आणण्याची एकही संधी आत्तापर्यंत सोडलेली नाही. मिलिंद कीर यांनी सातत्याने शेट्ये यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या आहेत. त्यामुळे सेनेच्या आरोपांचे वार बोथट करण्यासाठी उद्याच्या रत्नागिरी दौऱ्यात तटकरे, जाधव कोणते जालीम औषध वापरणार, कोणत्या मुद्यांवर हल्लाबोल करणार, त्यांच्या हल्लाबोलमुळे विरोधक शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होणार का? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी)दोन ‘उ’च्या लढाईत कोणाची बाजी?दुुसरीकडे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनल्याने शिवसेनेचे स्थानिक आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागांवर शिवसेनेचा झेंडा रोवण्याची जोरदार तयारी केली आहे. ही निवडणूक सेनेचे स्थानिक आमदार उदय सामंत व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. दोन ‘उ’च्या लढाईत कोणाला ‘उउ’ करावे लागणार व कोणाचे भाग्य फळफळणार हे सुध्दा ठरणार आहे. भाजपचा राष्ट्रवादीला मूक पाठींबा?राज्यसत्तेत शिवसेनेला भाजपने बरोबर घेतले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र सेनेशी काडीमोड घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. रत्नागिरीतही त्याचाच प्रत्यय येत असून, भाजपचा प्रचार हा अत्यंत गुप्तपणे, शांतपणे सुरू आहे. प्रचाराचा डामडौल कुठेही नाही. त्यामुळे भाजपच्या जागा आल्या नाही तरी चालेल पण सेनेचा विजय नको, अशी भूमिका भाजपकडून घेतली जात असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादीसाठी ही भूमिका पूरक ठरणार असल्याचाही बोलबाला आहे. यश नाही तर... : पक्षपातळीवर परिणामकोणत्याही स्थितीत या दोघांनाही निवडणुकीत यश आले नाही तर त्याचे परिणाम पक्ष पातळीवर त्यांना सोसावे लागतील. फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.