शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागावर ताशेर

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा : शिक्षण समितीच्या सभेत खडाजंगीे

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचा आरोप होत असतानाच आता चक्क शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी ‘शैक्षणिक गुणवत्ता’ या मुद्यावरून शिक्षण विभागावर ताशेरे ओढले. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली. गटशिक्षणाधिकारी सभागृहात केवळ कागदोपत्री माहिती पुरवत असून प्रत्यक्षात मात्र गुणवत्तेबाबत ‘हवेत’ न राहता सद्यपरिस्थितीत गुणवत्तेची स्थिती काय आहे ते पहावे. शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी घसरत चाललेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर वेळीच रिमोट दाबा, असे आदेशही यावेळी प्रकाश कवठणकर यांनी दिले.शिक्षण समितीची मासिक सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, स्रेहलता चोरगे, सुषमा कोदे, राजेंद्र म्हापसेकर, विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, फादर लोबो, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल, सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत जात असल्याचे आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उदाहरणासह सभागृहात सादर केले असल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी मंगळवारच्या सभेत शैक्षणिक गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागावर ताशेरे ओढले.दोडामार्ग तालुक्यातील शाळांची भरारी पथकामार्फत तपासणी केली असता एका शाळेत शिक्षकालाच एक प्रश्न विचारला असता त्यांना त्याचे उत्तर देता आले नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुलांना साध्या प्रश्नाचे उत्तर जर देता येत नसेल तर कठीण परिस्थिती आहे. यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष नसून तुम्ही शाळांवर भेटी देता की नाही? यावर सभापतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांची ढासळत चाललेली गुणवत्ता रोखण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांनी रिमोट दाबावा व शिक्षकांवर वचक निर्माण करीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापतींनी दिले.देवगड तालुक्यात १०१ पदवीधर शिक्षकाची पदे रिक्त असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य विष्णू घाडी यांनी करीत या विभागावर नाराजी व्यक्त केली. देवगडवरच अन्याय होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावर सभापती प्रकाश कवठणकर यांनी या विषयावर आपण मार्ग काढू, असे सांगत वादावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)