शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

तळवडे शाळा जिल्ह्यातील पहिली डिजिटल स्कूल

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

शिक्षण विभाग : शाळेत अवतरले संगणक युग...

रहिम दलाल-रत्नागिरी  --विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील तळवडे शाळा क्रमांक १ ही जिल्हा परिषदेची पहिली शाळा डिजिटल स्कूल करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी रुजू झाल्यावर दोन महिन्यांतच जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागाने केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे. जिल्हा परिषदेच्या २७८६ प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा १६६ आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.संगणक युग असल्याने विद्यार्थ्यांचा त्याचा वापर शालेय जीवनापासून व्हावा, त्यादृष्टीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दूरदृष्टी समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनाही डिजिटल स्कूल बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येणार असून, त्याची सुरुवात चिपळूण तालुक्यातील तळवडे शाळा क्रमांक १ मधून करण्यात आली आहे.ही शाळा इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत आहे. तळवडेतील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डिजिटल स्कूल करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्वांनी मिळून लोकवर्गणीतून २ लाख रुपये गोळा केले. संगणक वर्गखोली बांधून संगणक, एलसीडी प्रोजेक्टर व सॉफ्टवेअर यासाठी ८० हजार रुपये खर्च करुन ते खरेदी करण्यात आले. त्यामुळे ही शाळा डिजिटल स्कूल झाली.+मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अध्यापनाचे धडे देण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात तळवडे शाळा क्रमांक १ मधून झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुलांना विद्यार्थीदशेतूनच संगणक हाताळता येणार असून, शाळांचा शैक्षणिक दर्जाही सुधारणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा भविष्यात डिजिटल स्कूल करण्यासाठी भर दिली जाणार आहे. - एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.