शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी नदीपात्रात सापडले बिबट्याचे धड

By admin | Updated: September 1, 2016 00:39 IST

अवयवांच्या तस्करीचा संशय : कुडासे-जाधववाडी येथील घटना; पंजे, शिर छाटून बिबट्याला फेकले नदीत

दोडामार्ग : कुडासे-जाधववाडी पुलाजवळ तिलारी नदीपात्रात पंजे व शिर छाटलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याची अज्ञातांनी शिकार करून पंजे, शिर छाटल्यानंतर धड नदीपात्रात फेकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याच्या दात व नखांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने यामागे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे रॅकेट असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.कुडासे-जाधववाडी पुलावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिलारी नदीपात्रात शिर छाटलेल्या अवस्थेत एक मृत बिबट्या पुलाला अडकल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वनविभागाला कळविताच वनक्षेत्रपाल सचिन आठवले, वनपाल चंद्रकांत खडपकर, वनरक्षक म. ल. नाईक, शिवाजी रेडकर, संंजय नीळकंठ, विलास साळकर, सुरेश आईर आदी घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर या मृत बिबट्याला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. यावेळी बिबट्याचे पंजे व मुंडके नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बिबट्याची शिकार करून त्याच्या अवयवांची तस्करी केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)दोन वर्षांपूर्वीही झाली होती शिकारदोन वर्षांपूर्वी तालुक्यात वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे अवषेशही आढळले होते. मात्र, मागील दोन वर्षांत वनविभागाच्या धडक कारवाईमुळे हे प्रकार थांबले होते; पण बुधवारी शिर व पंजे नसलेला मृत बिबट्या आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मृत बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, हा बिबट्या गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नदीपात्रात असण्याची शक्यता आहे. त्याचे शिर व पंजे मगरींनी खाल्ले असावेत किंवा ते सडले असावेत.- सचिन आठवले (वनक्षेत्रपाल)