शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘झोपा काढो, टोप्या घालो’

By admin | Updated: January 21, 2016 00:25 IST

बंद नळपाणी योजना : अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आंदोलन

रत्नागिरी : जिल्ह्यातील जवळपास १९० गावे आणि ४१८ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या अनेक नळपाणी योजना बंद आहेत. मात्र, यात दोषी असणाऱ्यांवर प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. निद्रिस्त असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर पांढऱ्या टोप्या परिधान करून अनोख्या पद्धतीने ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन दिवसभर करण्यात येणार असल्याची माहिती गाव विकास समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या नळपाणी योजना मंजूर करताना तत्परता दाखवली जाते. मात्र, योजना सुरु झाल्यानंतर ती बंद होण्याबाबत, त्यातील गैरव्यवहाराच्या तक्रारींबाबत तेवढेच दुर्लक्ष केले जाते. याचाच निषेध करण्यासाठी गाव विकास समितीने २६ जानेवारी रोजी ‘झोपा काढो, टोप्या घालो’ आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर २७ रोजी एक दिवस लाक्षणिक निषेध उपोषण करण्याचा निर्णयही घेतला आहे. याबाबतची माहिती गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, सल्लागार सुहास खंडागळे, सरचिटणीस बाबुराव खेडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.संगमेश्वर तालुक्यात जवळपास ९ नळपाणी योजना बंद आहेत. हरपुडे, साडवली, चाफवलीतील भोयवाडी, फणसेवाडी, लांबेवाडी, गुरववाडी, ओझरखोल, निलगेवाडी, तळवडे खंडागळेवाडी आदी योजना या गैरव्यवहारांमुुळे बंद आहेत. लाखो रुपये खर्च करून सुरू झालेल्या या योजनांमध्ये ग्रामस्थांना आठ दिवसही पाणी मिळालेले नाही. यामध्ये ६५ लाखांच्या कनकाडी (गोताडवाडी) योजनेचाही समावेश आहे. या ठिकाणी दुरूस्ती न करताच येथे चक्क तीन नव्या योजना राबवण्यात आल्या आहेत. या सर्व अंदाधुंद कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गाव विकास समितीतर्फे करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बंद नळपाणी योजना व बोगस नळपाणी योजनांच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून गाव विकास समिती संघर्ष करत असून, जिल्हा परिषद प्रशासनाकडे याबाबत दाद मागत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे या गैरव्यवहाराबाबत कोणतीही कारवाई न करता प्रशासन झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे. त्यामुळेच आता गाव विकास समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रातिनिधीक आंदोलन : २३ रोजी प्रत्येक तहसीलसमोर होणारया आंदोलनानंतरही दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई झाली तर जिल्हाभर जनजागृती करण्यासाठी २३ रोजी निवडक सदस्यांसह ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन प्रत्येक तहसील कार्यालयासमोर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात येणार आहे.