शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

जनसुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी घ्या

By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST

संतोष भिसे : इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत कार्यशाळा

कणकवली : इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी जनसुनावणी घेऊन गावपातळीवरील अहवाल सादर करण्यात यावा. तसेच तालुकास्तरीय समितीकडे ५ जानेवारीपूर्वी अहवाल सादर करावा, असे सांगतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तसेच विकासही थांबणार नाही असे नियोजन करून गावाचा संतुलितपणे विकास करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले. येथील भगवती मंगल कार्यालयात गुरुवारी इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कणकवली तहसीलदार समीर घारे, सहाय्यक गटविकास अधिकारी मुस्ताक गवंडे, तालुका कृषी अधिकारी राठोड, देवगड तहसीलदार जीवन कांबळे, वैभववाडी तहसीलदार विजय जाधव यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.उपस्थित ग्रामसेवक तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संतोष भिसे म्हणाले, कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनसुनावण्या आयोजित कराव्यात. सखोल अभ्यासाअंती गावपातळीवर अहवाल तयार करून तालुकास्तरीय समितीकडे तो पाठविल्यानंतर त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे तालुकास्तरीय अहवाल पाठविला जाईल. जनसुनावणीचे छायाचित्रण करण्याबरोबरच छायाचित्रेही काढण्यात यावीत. ग्रामपंचायतीअंतर्गत वेगवेगळी महसुली गावे असतील तर जनसुनावणी प्रत्येक गावात घेणे आवश्यक आहेत. ग्रामसभा एकत्रितपणे घेतल्यास नियोजनासाठी ते सोयीस्कर ठरेल. इको सेन्सिटिव्ह झोनबाबत सर्व्हे करणाऱ्या व्यक्तीची स्थानिक पातळीवर नियुक्ती करण्यात यावी. त्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन तालुकास्तरावरून करण्यात येईल. एकदा इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्यावर त्याठिकाणी विकासाबाबत कृती करणे कठीण होणार आहे. याचा आताच विचार करून तसे नियोजन करण्यात यावे.तहसीलदार समीर घारे म्हणाले, दिवसेंदिवस जीवसृष्टीचा नाश होत आहे. जैव विविधता टिकवून ठेवणे गरजेचे असून त्यासाठीच इको सेन्सिटिव्ह झोन निर्माण करण्यात येणार आहे. दुर्मीळ वनस्पती, प्राणी, खनिज व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे रक्षण करण्यासाठी या झोनची आवश्यकता आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांना विश्वासात घेऊन इको सेन्सिटिव्ह झोनबाबत निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील गजानन तळेकर व ग्रामसेवक शिवाजी कांबळे यांनी उपस्थितांना आपल्या गावात इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत करण्यात आलेल्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली. (वार्ताहर)