शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सिंधु महोत्सव स्थानिक संघाच्या सहकार्यातून घ्या

By admin | Updated: December 2, 2014 21:26 IST

अतुल हुले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

वेंगुर्ले : स्थानिक पर्यटन संघाच्या सहभागाने सिंधु महोत्सवाचे आयोजन व्हावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल हुले यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा होऊन १७ वर्षे पूर्ण झाली, तरी जिल्ह्यात पर्यटन पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना व पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पर्यटन व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींबाबत व उपाय योजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे २००९ मध्ये दोन बैठका झाल्या. मात्र, त्यात लिहिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही एमटीटीए या संस्थेच्या ५० टूर आॅपरेटर्सना जिल्ह्यात आणून पर्यटन व्यावसायिकांच्या खर्चाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व पर्यटन सुविधांची ओळख करून दिली होती. मात्र, या उपक्रमाकडे प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरविली होती. एमटीटीए या संस्थेने कायमस्वरुपी पर्यटक जिल्ह्यामध्ये पाठविण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात काही सूचनाही केल्या होत्या. मात्र, प्रशासनाला त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास वेळ मिळाला नाही. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधु महोत्सवाचे आयोजन करताना जिल्ह्याचा नियोजनपूर्वक विकास व्हावा, या दृष्टीने तालुका व गाव स्तरावरील स्थानिक पर्यटन संस्था पर्यटन व्यावसायिकांच्या समित्या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन कराव्यात, जिल्हा प्रशासन व पर्यटन महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिद्धी करून एमटीटीएसारख्या टूर आॅपरेटर्समार्फत मोठ्या प्रमाणात पर्यटन पॅकेज टूर पर्यटक जिल्ह्यात आणावेत, पर्यटकांची निवास व भोजन व्यवस्था स्थानिक समितीकडे द्यावी. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक समित्यांना आर्थिक सहकार्य करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)