शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा

By admin | Updated: January 9, 2016 23:54 IST

नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यावर केला पलटवार

सावंतवाडी : आम्ही युतीत असून, शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांचे भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा. आम्ही हातात काही बांगड्या भरल्या नाहीत, असा पलटवार शिवसेनेच्या नेत्या तथा नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यावर केला आहे. त्या सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी राजन पोकळे यांनी पालकमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पालकमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. तर प्रशासनासह पालकमंत्र्यांना योग्यवेळी झटके देऊ, असे म्हटले होते. त्यावर नगरसेविका अनारोजीन लोबो म्हणाल्या, झटके कसले देणार ते पहिले सांगा. झटके देण्याची नुसती भाषा करू नका. शिवसेना-भाजप राज्यात सत्तेत असून, दोघांनीही एकत्र राहिले पाहिजे. पालकमंत्री विकास करतात. पण काही ठिकाणी ते निर्णय हळू घेतात. म्हणून टोकाची भाषा वापरणे योग्य नाही. भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. दोघांना ऐकामेकांची गरज लागणार आहे. मग टीका कशासाठी करता? असा सवालही लोबो यांनी उपस्थित केला.काळसेकर झटक्याची भाषा करीत असतील तर तुमच्या झटक्यांना शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील, असेही यावेळी लोबो यांनी भाजपला सुनावले आहे. केसरकर हे राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आम्हाला सतत भेटतील अशी अपेक्षा करणे योग्य नसून, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे. ते निर्णय हळूहळू घेत असतील. पण ते निर्णय योग्यच असतील. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे, असे पोकळे म्हणाले. (प्रतिनिधी)काका कुडाळकरांचा अनारोजीन लोबोंना टोलाझटके द्यायला आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणणाऱ्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांना यानिमित्ताने बांगड्या भरण्याची सवय होईल, असा उपरोधिक टोला भाजपचे नेते काका कुडाळकर यांनी हाणला. लोबो यांच्या टीकेचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. ते भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजपच्या वाक्युध्द गेले दोन सुरू असून, शनिवारी शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी अतुल काळसेकर यांच्यावर टीका केली. या टिकेला कुडाळकर यांनी उत्तर दिले. काळसेकर यांनी काम होत नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. मग त्यावर टीका कशाला केली पाहिजे आणि लोबो यांना एवढीच जर बांगड्या भरण्याची हौस असेल, तर त्यांनी त्या भराव्यात. त्यानिमित्ताने त्यांना सवय होईल. आम्हाला सत्तेचे भान आहे. याचे ज्ञान अन्य कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असेही कुडाळकर यांनी यावेळी सांगितले.