शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक संस्कार होतील याची काळजी घ्या : सदाशिव पांचाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 16:45 IST

तळेरे : मुलांच्या यश- अपयशात पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. ह्यतुला काहीच कळत नाही , ह्यतु वेंधळा आहेसह्ण, ह्यतुला हे आयुष्यात कधीही जमणार नाहीह्ण या सारख्या नकारात्मक वक्तव्याचा मुलांवर फार भयानक परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या मनावर सकारात्मक संस्कार होतील, याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी, असे प्रतिपादन तळेरे येथील माईंड ...

ठळक मुद्देनवी मुंबई खारघर येथे मार्इंड ट्रेनर

तळेरे : मुलांच्या यश- अपयशात पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. ह्यतुला काहीच कळत नाही , ह्यतु वेंधळा आहेसह्ण, ह्यतुला हे आयुष्यात कधीही जमणार नाहीह्ण या सारख्या नकारात्मक वक्तव्याचा मुलांवर फार भयानक परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या मनावर सकारात्मक संस्कार होतील, याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी, असे प्रतिपादन तळेरे येथील माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात केले.

नवी मुंबई - खारघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांच्या मार्गदर्शनाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता मगर, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सचिन पाटील, सुमित्रा खेडकर, कविता पाटील, भाविका घोलप, राजेंद्र मोकल, विशाखा नाईक, सारिका पाटील, स्मिता सावंत, अरविंद घुगे, श्रीकांत सुतार आदी मान्यवर, शिक्षक उपस्थित होते.

माणसाचे सुख आणि दुख:, माणसाचे यश आणि अपयश मेंदुतून निर्माण होते. लहान मुलांचा मेंदू कॉम्प्युटरसारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे. तरच विद्यार्थी खºयाअर्थाने हुशार बनतील. त्यांच्यात एक आत्मविश्वास राहिल. आय कॅन डू इट हा विचार मुलांमध्ये विकसित करणे हे पालक - शिक्षक यांचे कर्तव्य आहे, असे सदाशिव पांचाळ यांनी सांगितले.याच विद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी झालेल्या मार्गदर्शनानंतर मार्इंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन पांचाळ यांनी शिक्षकांचे समाधान केले. श्रीकांत सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पांचाळ यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. पाहुण्यांची ओळख सचिन पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन राजेंद्र मोकल यांनी केले.