शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नि:पक्षपातीपणे कारवाई करा

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

बलात्कारप्रकरणी पोलिसांना निवेदन : कणकवलीत काँग्रेसच्यावतीने मूकमोर्चा

कणकवली : कणकवलीत घडलेल्या महिला सामूहिक बलात्कार प्रकरणात सत्तारुढ पक्षाचे कार्यकर्ते सहभागी आहेत. त्यामुळे कुणाच्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे पोलिसांनी कारवाई करून दोषी असलेल्यांना कडक शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मूक मोर्चा काढत एका निवेदनाद्वारे काँग्रेसच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.दरम्यान, काँग्रेस संपर्क कार्यालयाकडून पोलीस स्थानकापर्यंत गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. तसेच जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांची भेट घेतली तसेच निवेदन सादर केले.या भेटीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, पंचायत समिती उपसभापती बाबासाहेब वर्देकर, महेश गुरव, माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, किशोर राणे, बंडू हर्णे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. युती शासनाची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखीन दोन-तीन आरोपींचा समावेश असल्याची चर्चा शहरात असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. त्यामुळे तिला सुरक्षितता पुरविण्यात यावी. या महिलेवर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास तिला भाग पाडले जावू शकते. तसे होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घ्यावी, असे सतीश सावंत यांनी सांगितले.तसेच या प्रकरणामुळे कणकवली शहराची बदनामी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास मोकाट सुटलेले आरोपी उजळ माथ्याने शहरात फिरताना दिसतात. हे समाजहिताच्या दृष्टीने घातक आहे, असे मेघा गांगण यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृह तसेच शहरातील अन्य जागांचा गैरवापर करण्यात येत असेल तर पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सुरेश सावंत यांनी केली. (वार्ताहर)सतीश सावंत : दहशत कोणाची हे जनतेसमोर आलेकणकवलीत अत्याचार प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी दहशत कोणाची आहे हे या निमित्ताने जनतेसमोर आले आहे. काँग्रेसवर दहशतीचा आरोप करण्याअगोदर या लोकांनी आत्मपरिक्षण करावे आणि त्यानंतरच दुसऱ्यांवर आरोप करावेत. या प्रकरणाचा शांततेच्या मार्गाने निषेध करीत काँग्रेसच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.पोलिसांचे केले अभिनंदनकणकवलीत घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेबद्दल काँग्रेसच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी येणाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.