शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई मागे घ्या, मग फोटो लावतो

By admin | Updated: December 8, 2015 00:38 IST

नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेसअंतर्गत राजकारण : काढलेले फोटो लावण्यासाठी आग्रह

कणकवली : नगराध्यक्ष निवडीवरून झालेल्या राजकीय घडामोडीनंतर नगरपंचायतीमधील नारायण राणे यांची छायाचित्रे काढून टाकण्यात आली. सोमवारी कॉँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीत धडक मारत राणेंचे छायाचित्र पुन्हा लावण्याची मागणी केली. मात्र, आधी कारवाई मागे घ्या मग फोटो लावतो, असा पेच टाकत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी हा डाव उधळून लावला. नगराध्यक्ष निवडीनंतर नगरपंचायतीमधील कॉँग्रेस नेते नारायण राणे यांचे फोटो काढण्यात आले होते. त्या जागी प. पू. भालचंद्र महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली होती. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, सोमा गायकवाड उपस्थित होते. सुरेश सावंत यांनी नगरपंचायतमधील नारायण राणे यांची छायाचित्रे काढल्याबद्दल आक्षेप नोंदवला. तुम्ही स्वत:ला कॉँग्रेसचे म्हणवता तर राणेंचे फोटो का काढले? असा प्रश्न केला. उपनगराध्यक्ष पारकर यांनी आमची बाजू समजून घ्या, असे सांगितले. आम्ही आतापर्यंत कॉँग्रेसचे ्रप्रामाणिकपणे काम केले. परंतु काही व्यक्ती राजकीय डावपेच करत आम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधकाम सभापतीपद रूपेश नार्वेकर यांना नारायण राणे यांच्या आदेशाने मिळाले. नगराध्यक्षपदी प्रज्ञा खोत राणे यांच्या आदेशानंतरच झाल्या. परंतु अलिकडच्या काही काळात संदेश पारकर गटाच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न झाला. आमचे नेते संदेश पारकर यांच्या म्हणण्यानुसार झाले असते तर आमचा नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम यांनाही विरोध नव्हता. असे न होता आमच्या गटातील काहींना आमीष दाखवून आमच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न झाला. नार्वेकर सभापती झाल्यानंतरही राणे यांचे फोटो भिंतीवर होते. नंतर मात्र आमच्यावर कारवाई करण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आले. आम्ही असे कोणते पक्षविरोधी काम केले आहे? असा प्रश्न कन्हैया पारकर यांनी केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष शशी राणे, मिलिंद मेस्त्री, सोनू सावंत, अजय सावंत, सुशील सावंत, दत्ता काटे, सुनील साळसकर, सचिन पारधिये, पवन भोगले, मनोज जाधव, गौरव यादव, हनुमंत बोंद्रे, लवू परब, विक्रम राणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वरिष्ठांकडे बाजू मांडा : चर्चा करुन निर्णय घेणार