राजापूर : केंद्रीय रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्या राजापूर दौऱ्यात सौंदळ स्थानकाबाबत मोठा उहापोह झाल्यानंतर या रेल्वेस्थानकाचा प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. प्रभू यांनी सूचना दिल्यानंतर कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांसह चारजणांच्या पथकाने नियोजित सौंदळ स्थानकाच्या जागेची पाहणी केली.अनेक वर्षांच्या मागणीनंतर मागील आठवड्यात प्रभू यांना या स्थानकाबाबत निवेदन देण्यात आले होते. ग्रामस्थांनी त्यांची भेटही घेतली. त्यावेळी स्वत: या प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन त्यांनी दिले. सौंदळ स्थानकाच्या नियोजित जागेची पाहणी करुन अहवाल देण्याचे आदेश कोकण रेल्वेचे महाप्रबंधक भानू तायल यांना दिले होते. त्यानुसार क्षेत्रीय महाप्रबंधक निकम यांच्यासह अन्य तिघांनी सौंदळला भेट देऊन नियोजित जागेची पाहणी केली.येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा व अनेक गरजांशी हा प्रश्न निगडीत असल्याने तो मार्गी लागावा, असा आग्रह गेली कित्येक वर्षे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता. प्रभू हे कोकणचे असल्याने त्यांना भेटून या जागेबाबत अंतिम निर्णय घेऊन रेल्वेस्थानकाचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. रेल्वेच्या महाप्रबंधकांनी सौंदळला भेट दिल्यानंतर आशेचा किरण दिसत आहे. यावेळी सौंदळ रेल्वेस्टेशन निर्माण समितीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत देशपांडे यांच्या नेतृत्त्वाखालील समितीचे सदस्य उपस्थित होते.सौंदळ रेल्वेस्थानर व्हावे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या समिती चे नेतृत्व देशपांडे हे करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच समितीने प्रभू यांची राजापूर येथे भेट घेतली. त्यानंतर प्रभू यांनी कोकण रेल्वेचे महाप्रबंधक भानू तायल यांना सौंदळ येथे भेट देऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर तायल यांनी या भागाला भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर हालचालिनी वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)दक्षिणेकडे असलेल्या तालुक्यांसाठी सौंदळ रेल्वेस्थानक व्हावे अशी अनेक वर्षांची असलेली मागणी आता सुरेश प्रभू यांच्या भेटीनंतर मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. चंदूभाई देशपांडे यांचे प्रयत्नकेंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या राजापूर दौऱ्यानंतर सौंदळ रेल्वेस्थानकाच्या नियोजित जागेची तायल यांनी केली पाहणी चंदूभाई देशपांडे यांनी घेतली होती रेल्वेमंत्र्यांची भेट राजापूर, लांजा, खारेपाटण, पाचल व आसपासच्या परिसराला सौंदळ स्थानक हवेवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली पाहणी
तायल यांची सौंदळला भेट
By admin | Updated: January 9, 2015 00:01 IST