शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा अद्ययावत हवी

By admin | Updated: July 8, 2014 00:42 IST

ई. रविंद्रन : आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

ओरोस : आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा उपलब्ध असली तरी ती अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असणेही गरजेचे आहे. शासनाच्या विभागानी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील यंत्रणांचे संवादाची सर्व यादी, माहिती अद्ययावत करण्यात यावी या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अंतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी संतोष भिसे (कणकवली), रविंद्र बोंबले (कुडाळ), जिल्हास्तरीय सर्व खात्यांचे विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, सर्व विभागानी आपत्ती व्यवस्थापनची कार्यवाही काटेकोरपणे करावी. जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते, साकव दुरुस्ती करून घेण्यात यावी. आपत्ती काळात निवाऱ्यासाठी निवडलेल्या शाळांबाबत सद्यस्थिती माहिती अद्ययावत करण्यात यावी, मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नगरपालिका क्षेत्र नाले साफसफाई, पूर नियोजन, धोकादायक इमारतींबाबत योग्य ती उपाययोजना करावी. पाटबंधारे विभागांनी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन व विसर्गाचे नियोजन करून ठेवावे. पूर प्रतिबंधक आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. पर्यटनासाठी होडीमधून प्रवास केला जातो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याकडेही मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या संबंधित पर्यटक होडीमध्ये लाईफ जॅकेटच उपलब्ध नसल्याचे आढळून आलेले आहे. तरी ही बाब गंभीर असून अशाप्रकारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. बंदर अधिकाऱ्यांनी तातडीने सिंधुदुर्ग किल्ला किंवा पर्यटक वाहतूक करीत असलेल्या बोटीत लाईफ जॅकेट उपलब्ध करून देऊन त्याचा तात्काळ अहवाल कळवावा. तसेच आपत्कालीन कालावधीतील उपाययोजना व माहितीचा अहवाल तात्काळ कळवावा.जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विभागाने पूरप्रवण क्षेत्रातील झालेले नुकसान स्थानिक प्रशासनाकडून माहिती प्राप्त करून त्याचा अहवाल साद करावा. वन विभागाने वन विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यावेळी प्रत्येक विभागाने माहिती अद्ययावत असून जिल्हास्तरीय आपत्ती यंत्रणेकडे देण्यात आली असल्याचे बैठकीत सांगितले. (वार्ताहर)