शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे आज उद्घाटन

By admin | Updated: January 25, 2016 01:01 IST

रत्नागिरीत तयारी पूर्ण : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू वास्कोमधून रिमोटद्वारे करणार प्रारंभ

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचे (ट्रॅव्हलेटर) उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज, सोमवारी दुपारी १२ वाजता वास्को येथून रिमोटद्वारे करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावर उद्घाटनाची सर्व सज्जता ठेवली आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीत उद्घाटन होत असलेला हा पहिलाच ट्रॅव्हलेटर आहे. याबाबतची माहिती रविवारी कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय व्यवस्थापक बी. बी. निकम यांनी दिली. कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. भौगोलिक रचनेमुळे या स्थानकावरील प्लॅटफॉर्म १२ मीटर्स खोलीवर तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना जिन्याद्वारे प्लॅटफॉर्मवर ये-जा करावी लागते. याचा विचार करूनच हा ट्रॅव्हलेटर विमानतळावरील ट्रॅव्हलेटरच्या धर्तीवर उभारला आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तीन महिन्यांपूर्वीच सरकत्या जिन्याचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापूर्वीच टॅव्हलेटरचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे त्याचे उद्घाटन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी क्षेत्रिय व्यवस्थापक बी. बी. निकम व कोकण रेल्वेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी) तासात ९ हजार प्रवासी वाहतूक या स्वयंचलित ट्रॅव्हलेटरवर साहित्यासह उभे राहिल्यानंतर प्रवाशांना न चालता स्थानकाच्या वरील भागात जाणे शक्य होणार आहे. एका तासात ९ हजार प्रवाशांची वाहून नेण्याची क्षमता या ट्रॅव्हलेटरमध्ये आहे. १ मीटर रुंद व २९.२६ मीटर एवढी याची लांबी आहे. उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा खर्च आला असून त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा दर्जा आहे. त्यासाठी १५ किलोवॅट क्षमतेची विद्युत मोटार असून थ्री फेज विद्युत जोडणीवर हा ट्रॅव्हलेटर चालणार आहे.