शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

By admin | Updated: March 18, 2016 23:58 IST

ऐन हंगामात भीतीचे सावट : शेतकरी धास्तावले

कडावल : पाऊस व पाऊससदृश वातावरण, प्रचंड उकाडा, थंडी अशा सतत बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू बागायतींवर अनिष्ट परिणाम होत आहे. पावसाअभावी आधीच भातशेती हातची गेलेली असताना आता निसर्गाच्या फटक्याने बागायतीही धोक्यात येऊ लागल्या आहेते. ऐन हंगामातच बदलत्या वातावरणाची टांगती तलवार असलेल्या बागायती शेतकरी धास्तावले असून, भातशेती गेली आता बागातरी वाचणार का? अशी भीती व्यक्त होत आहे. यंदा पावसाअभावी खरीप भात हंगाम तोट्यात गेला. भातशेती तोट्यात गेली. निदान बागायतींपासून तरी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेला शेतकरी बागायतीवर लक्ष देत अविरत कष्ट करीत राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त बागायती पिकांवर होती. मोहरधारणा काळात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे परिसरातील आंबा, काजूच्या वृक्षांना चांगला मोहोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. यंदा फलधारणा चांगली होणार, या आशेने शेतकरी सुखी होता; पण ऐन हंगामातच निसर्गाने पुन्हा मेटाकुटीला आणले आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगली फलधारणा होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.दिवसभरात वातावरण व तापमानात अनेकवेळा बदल होत आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थंडी असते. सकाळनंतर उष्णतामान वाढण्यास सुरुवात होते. दुपारच्यावेळी तर उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होते. दिवसा वातावरण ढगाळ व पाऊससदृश असते. काही भागात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम येथील आंबा, काजू व सुपारी बागायतींवर होत आहे.परिसरातील कडावल, हिर्लोक, किनळोस, डिगस, वेताळबांबार्डे, रांगणातुळसुली, आवळेगाव, आदी गावांतील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन बागायती उभ्या केल्या आहेत. बागायती धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, भवितव्याबाबत त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)