शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शोभना कांबळे यांना स्वावलंबन पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:06 IST

महाराष्ट्र शासन : ‘महालक्ष्मी सरस’च्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्यातील बचत गटांचाही सन्मान

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा राजमाता स्वावलंबन पुरस्कार लोकमतच्या पत्रकार शोभना कांबळे यांना रविवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस - २०१६ च्या उद्घाटन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे मुंबई (वांद्रे) येथील म्हाडा मैदानावर राज्यातील महिला उद्योजक आणि ग्रामीण कारागिरांनी बनवलेल्या वस्तू व कलाकृतींची विक्री व प्रदर्शन ‘महालक्ष्मी सरस - २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर लोकसभा सदस्या पूनम महाजन, अ‍ॅड. आशिष शेलार, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मुख्य सचिव व्ही. गिरीराज, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी तसेच नाबार्डचे प्रतिनिधी पद्मनाभन उपस्थित होते. प्रारंभी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्यातील पुरस्कारप्राप्त बचत गटांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व विभागीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त बचत गटांना तसेच सर्वोत्कृष्ट पत्रकार आणि बँकांना गौरविण्यात आले. लोकमतच्या पत्रकार शोभना कांबळे यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रधान सचिव वि. गिरीराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एकनाथ साळवी, अंजली साळवी उपस्थित होते. जिल्ह्यातील महिला बचत गट चळवळ वृद्धींगत व्हावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.जिल्हास्तरावर निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन बचत गटांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीसमर्थ स्वयंसमूह महिला बचत गट, चिपळूण, जाकादेवी स्वयंसहायता महिला बचत गट, विसापूर, ता. गुहागर, नवलाईदेवी स्वयंसहायता महिला बचत गट, मेर्वी कुर्धे (ता. रत्नागिरी) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. या प्रदर्शनात विविध जिल्ह्यातील ४५०हून अधिक बचत गटांनी सहभाग घेतला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील २१ बचत गटांनी या प्रदर्शनात आपल्या विविध वस्तू विक्रीकरिता ठेवल्या आहेत. हे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी विक्री झाल्याचे बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)