शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाची कारवाई होणार

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

तळवडेतील तांदूळ घोटाळा प्रकरण : संस्था पदाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर उपोषण मागे

तळवडे : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयातील शालेय पोषण आहारातील तांदुळ घोटाळ्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी तक्रारदार बाळा जाधव, नवसाजी परब यांनी विद्यालयासमोर आमरण उपोषण केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी ३० आॅक्टोबरला मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान या घटनेला लागलेल्या राजकीय रंगामुळे विद्यालयाच्या परिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण राहिले. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री जनता विद्यालयात पोषण आहारामध्ये अफरातफर झाली असून पोषण आहारात घोटाळा झाल्याची तक्रार तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव व नवसाजी परब यांनी केली होती. त्यानुसार संबंधित शाळेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती, शैक्षणिक अधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांनी भेट दिली होती. यावेळी शाळेत रजिस्टर नोंदीनुसार अतिरिक्त पोषण आहार सापडला, असे अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक विभागाचे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांनी तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाला दिले होते. पण प्रत्यक्षात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदार बाळा जाधव व नवसाजी परब यांनी तळवडे श्री जनता विद्यालयाकडे आमरण उपोषण सोमवारी सकाळपासून सुरू केले होते. त्यानुसार जनता विद्यालयाकडचा परिसर तंग बनला होता. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णू जयराम पेडणेकर व इतर संचालक यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर ३० आॅक्टोबरपर्यंत कारवाई करतो, असे तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यांनंतर हे आमरण उपोषण सोडण्यात आले. त्यावेळी तळवडे सरपंच पंकज पेडणेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळा पेडणेकर, भालचंद्र कांडरकर, जिल्हा परिषद सदस्या निकीता जाधव, उत्तम परब, जालींदर परब, बाळू साळगावकर, विजय रेडकर, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. या उपोषणावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, प्रमोद गावडे, यांनी भेट दिली. निरवडे पोलीस पाटील अजित वैद्य, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी यांनी अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली होती. (प्रतिनिधी)मुख्याध्यापक निर्दोष : प्रकाश परबशाळेचे मुख्याध्यापक मालवणकर हे पोषण आहारात दोषी नसून त्यांनी कोणत्याही प्रकारची अफरातफर केली नाही. राजकीय प्राबल्याचा वापर करून निर्दोष प्रामाणिक शिक्षकास या प्रकरणात गुंतविण्याचे काम उपोषणकर्ते बाळा जाधव व सहकारी करीत आहेत, असे मत प्रकाश परब यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शासन निर्देशानुसार १०० व १५० ग्रॅम प्रत्येक मुलास पोषण आहार शासन नियमानुसार पटसंख्येनुसार मिळतो. पण सर्व मुले तेवढे पोषण आहार सेवन करत नाही. अतिरिक्त तांदुळ राहिल्यास त्याच प्रशालेतील मुलांना देण्यात येतो. राजकीय स्टंटबाजी करून त्यांना गोवण्यात येत आहे.- प्रकाश परब, संस्था संचालकगुरूनाथ पेडणेकर : संस्थेस कारवाईचा अधिकार शालेय पोषण आहारात तळवडे श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक दोषी आहेत काय? या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ करू शकते. त्यानुसार प्रशासन स्तरावर तळवडे शिक्षण प्रसारक मंडळास लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाईचे अधिकार शिक्षण संस्थेस आहेत, असे स्पष्ट केले .