शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण वगळल्यास पाठिंबा

By admin | Updated: October 15, 2016 01:13 IST

राणे यांची केसरकरांना ग्वाही : जिल्हा नियोजन समिती सभा खेळीमेळीत

सिंधुदुर्गनगरी : राजकारण हे निवडणुकीपुरते असते. जिल्ह्याच्या विकासात राजकारण बाजूला ठेवून निपक्षपातीपणे काम करा, आपण कायमच सहकार्य करू, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिली. नारायण राणे यांनी सुचविलेल्या सूचना आणि सर्व प्रकल्पांबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिले. एकंदरीत जिल्हा नियोजनची शुक्रवारची सभा राणे आणि केसरकर यांच्यात झालेल्या सुसंवादाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार नारायण राणे यांनी घेतलेल्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या सभेत काही मुद्दे वगळता शांततेत झाली. यावेळी नारायण राणे यांनी सभागृहात मांडलेल्या सूचना आणि विकासाच्या सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याचे सुतोवाच केसरकरांनी दिले. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार राणे यांच्यात पूर्वीपासून असलेले राजकीय वैर पाहता शनिवारच्या नियोजन समितीच्या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा नियोजन समितीच्या या पूर्वीच्या सभा वादळी झाल्या होत्या. मात्र राणे यांनी सभागृहात प्रवेश करताच त्यांची प्रशासनावर असणारी पकड व कसब तसेच प्रश्नांवर मुद्देसुद उत्तरे अशा विषयावर जिल्हा नियोजन समिती सभेत त्यांची वेगळीच छाप दिसून आली. राणे पालकमंत्री असताना धाक आजही आमदार असताना कायम राहिला आहे. जिल्'ातील समाजकल्याणच्या सर्वच वसतीगृहाची झालेली दयनीय स्थिती, गोरगरीब रुग्णांची जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या सुविधांमुळे होत असलेली परवड आणि वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान या विषयावर या सभेत चर्चा करण्यात आली. ८ महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत जे मुद्दे विचारले गेले होते. त्यावर अद्याप पूर्तता न झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्'ात अनेक ठिकाणी गवे तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना गव्यांनी दुखापती केल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या बचावासाठी काही ठिकाणी सौर कुंपन केली आहेत. मात्र ती पूर्णपणे नादूरूस्त आहेत. असे सांगत मुख्य वन संरक्षक रमेश कुमार यांना खासदार विनायक राऊत, संदेश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर यांनी धारेवर धरले. गव्यांनीे दिगवळे येथील ज्या शेतकऱ्याला ठोकरुन जखमी केले आहे. त्याला उपचारासाठी लागलेल्या १ लाख ६७ हजार रुपयांच्या रकमेपैकी शिल्लक रक्कम तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून द्यावेत अशाही केसरकर यांनी सूचन् दिल्या. अन् ठिणगी पडली.... समाजकल्याण विभागांतर्गत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे सांगत हा विषय सात वर्षांपासून सुरु असून यासाठी पालकमंत्री केसरकर यांना टार्गेट करु नये असे अतुल काळसेकर यांनी सांगताच सभागृहात शांततेत सुरु असलेली सभा अचानक वादळी झाली. या विषयामुळेच वादाची ठिणगी पडली. कॉँग्रेस आमदारांसह सर्वच सदस्यांनी आक्रमक होत काळसेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने या वादावर अखेर पडदा पडला.