शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

बायोमॅट्रीक प्रणाली बाबत पुरवठा विभागाने प्रशिक्षण द्यावे : दीपक केसरकर

By admin | Updated: July 8, 2017 15:12 IST

सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा दक्षता समितीच्या बैठकीत सूचना

आॅनलाईन लोकमत सिंधुदुर्गनगरी दि. ८ : सर्व रास्त भाव धान्य दुकानातून बायोमॅट्रीक प्रणाली सुव्यवस्थित सुरु होण्याबाबत धान्य दुकानदारांची कार्यशाळा आयोजित करुन पुरवठा विभागाने बायोमॅट्रीक प्रणालीचे प्रशिक्षण द्यावे अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरवठा दक्षता समितीच्या बैठकीत केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह, समिती सदस्य स्नेहा तेंडुलकर, राजश्री धुमाळे, भावना कदम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा उपनिबंधक मेघा वाके, जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत आदी उपस्थित होते.

उज्वला लाभधारकांना धान्याचा लाभ मिळणार

समिती सदस्या राजश्री धुमाळे यांनी या बैठकीत उज्वला अंतर्गत गॅस लाभधारक हे कनेक्शन घेण्यास तयार होत नाहीत. हे गॅस कनेक्शन घेतले तर धान्य मिळणार नाही असा त्यांचा समज आहे, अशी माहिती बैठकीत सांगितली. या बाबत पालकमंत्री केसरकर यांनी उज्वला गॅस अंतर्गत गॅस कनेक्शन घेतले तर केवळ त्यांना रॉकेल मिळणार नाही, पण नियमानुसार शिधापत्रिकेतील धान्याचा कोटा त्यांना मिळणार आहे. याबाबत उज्वला गॅस कनेक्शन मंजूर झालेल्या सर्व लाभधारकांनी गॅस कनेक्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान दारांची बैठक आयोजित करावी, गॅस एजन्सी यांनी त्यांचे दुकानात उज्वला गॅस कनेक्शन लाभधारकांच्या माहितीसाठी माहिती फलक लावावेत. आंगणवाडीसाठी धान्य पुरवठा जादा दराने केला गेला आहे. या बाबत त्यांना फरकाची रक्कम देण्याबाबत पुरवठा विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, फोंडा येथील घाऊक धान्य गोदाम दुरुस्ती प्रस्ताव सादर करावा, रॉकेल विक्रेत्यांनी फ्री सेल कोटा ठेवणे आवश्यक आहे. याबाबत पुरवठा विभागाने घाऊक रॉकेल विक्रेत्यांना सूचना द्याव्यात आदी सूचना या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मागिल बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले.