कणकवली : दहावीत शिकणाऱ्या सौरभ शिवराम मेस्त्री (वय १६, रा. सुतारवाडी, कलमठ) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी महेश श्रीधर मेस्त्री (३९, रा. कलमठ) यांनी पोलिसांत माहिती दिली. सौरभ हा येथील एस. एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन सुरू असून, तेथे जाऊन सौरभ दुपारी घरी परतला. शेजारीच आपल्या चुलत्यांच्या घराकडे जाऊन हार्मोनियम वाजवून तो घरी परतला. घरात त्याची आई आणि आजी होती. आई कपडे धुण्यासाठी मागील बाजूस गेली असता सौरभ याने मधल्या खोलीतील बारास नायलॉन दोरीने गळफास घेतला. सौरभ याने खोलीची दोन्ही दारे आतून बंद केली होती. काही वेळाने आई परतल्यानंतर दार उघडत नसल्याने माळ््यावरून आत प्रवेश केला असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. सौरभ हा अभ्यासात हुशार होता. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास हवालदार ए. वाय. पोखरणकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
कलमठ येथील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST