शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुहास कांबळे यांना सशर्त जामीन मंजूर

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

रत्नागिरीबाहेर न जाण्याची अट : हजेरी लावण्याचा आदेश

रत्नागिरी : ठेकेदाराची बिले मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले बीएसएनएलचे महाप्रंबधक सुहास कांबळे व चालक तन्वीर बागवान यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय रत्नागिरीच्या बाहेर न जाण्याच्या अटींसह इतर सशर्त अटींवर शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला. सुहास कांबळे हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक आहेत. नेहमीच्या कंत्राटी कामातील एका ठेकेदाराचे ७० लाख रुपयांचे बिल गेल्या काही दिवसांपासून त्याला मिळाले नव्हते. या बिलासाठी तो ठेकेदार अनेकदा दूरसंचारच्या कार्यालयाचे हेलपाटे मारत होता, परंतु त्याचे काम होत नव्हते. त्यामुळे त्या ठेकेदाराने सुहास कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळे यांनी ७० लाखांची ही रक्कम मिळावी, यासाठी ३ टक्के अर्थात तीन लाख रुपये लाच मागितली. त्यानुसार ठेकेदाराने तीन टक्के रक्कम म्हणजेच तीन लाख रुपये देण्याचे तयारी दर्शविली. त्यानंतर मुंबई सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार मुंबई सीबीआयने कांबळे व तन्वीर बागवान यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, त्यानंतर सीबीआयने सुहास कांबळे यांच्या घरी छापा टाकून खाते पुस्तके तपासली असता सुहास कांबळे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर सुहास कांबळे व तन्वीर बागवान यांचे झालेले संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले असल्याचे समजते. सुहास कांबळे यांनी कंपनीतील बरीच कामे मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचे समजते. शुक्रवारी सुहास कांबळे व तन्वीर बागवान यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. त्या अर्जावर न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. सुहास कांबळे यांना ५० हजारांचा डिपॉझीट करार, त्याचबरोबर सलग दोन दिवस मंगळवार व बुधवारी सीबीआय मुंबई येथे हजेरी लावणे, तसेच रत्नागिरी सोडण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्याचा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. तन्वीर बागवान याला ३० हजार डिपॉझिट करार व मंगळवार, बुधवारी सीबीआय कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)