शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीची नुकसान भरपाई परत जाणार

By admin | Updated: March 25, 2016 00:02 IST

संजय सामंत : स्थानिक प्रशासनावर जबाबदारी

सावंतवाडी : अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही सावंतवाडी तालुक्यातील चार हजार शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याला सर्वस्वी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भावई शेतकरी मंडळ झारापचे अध्यक्ष संजय सामंत यांनी केली आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेतकरी यशवंत प्रभूतेंडोलकर, अमेय प्रभूतेंडोलकर, निरवडे गावचे सरपंच उत्तम पांढरे, आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत; पण त्यांचे निराकरण होत नाही. सावंतवाडीत तब्बल चार हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शासनाकडून आलेले सुमारे अडीच कोटी रुपये मागे जाऊ शकतात. ही नुकसान भरपाई मार्चपूर्वी देणे अपेक्षित असल्याचे सामंत यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्यात आला. पण, सावंतवाडी तालुक्यात मात्र या उलट झाले आहे. ३० टक्के क्षेत्राचाच पंचनामा करण्यात आला आहे.त्यामुळे ही नुकसान भरपाई फक्त ३० टक्केच मिळणार आहे. शासनाने सामाईक खातेदाराबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच या निर्देषानुसारच ही नुकसान भरपाई द्या, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही अद्याप ६० टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पोहोचली नाही. हे दुर्दैव आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आमची बैठकही घेतली. त्या बैठकीत स्थानिक प्रशासन म्हणजेच तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या चुकीच्या धोरणामुळेच ही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले असतानाही अद्यापपर्यंत हा अन्याय दूर करण्यात आला नाही.सावंतवाडी तालुक्यातील ४२६८ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने त्यावर तातडीने निर्णय व्हावा. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आम्ही लक्ष वेधणार असून त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)