शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपनिरीक्षकाच्या बडतर्फीच्या हालचाली

By admin | Updated: June 13, 2014 01:44 IST

लाचलुचपतच्या अहवालाची प्रतीक्षा : प्रशिक्षणार्थींना अधीक्षकांचे खडे बोल

सावंतवाडी : दोडामार्ग येथे काल, बुधवारी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेला राहुल कुमार दणाणे हा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा चौकशीअंती होणार असून, सिंधुदुर्ग पोलीस सध्या लाचलुचपत विभागाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, दणाणे याला आज, गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन यापुढे खबरदारी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. दोडामार्ग येथे काल राहुल कुमार दणाणे या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या घटनेमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ माजली असून, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनीही गंभीर दखल घेतली आहे. दणाणे हा प्रशिक्षणार्थी पोलीस आहे. त्याला सेवेत येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी होता. असे असताना प्रशिक्षणार्थी सेवेच्या काळातच लाचलुचपतच्या गळाला अडकल्याने दणाणे याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला अद्याप अधिकृत पोलीस सेवेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याने शासनाला या कारवाईचा अधिकार आहे. (प्रतिनिधी) चौकशीअंती निर्णय : साहू राहुल दणाणे याच्या बडतर्फीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना विचारले असता, आम्ही चौकशी समिती नेमणार असून, त्यानंतरच याबाबत अधिकृत कारवाई होणार आहे. दणाणे प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. त्यामुळे अशी कारवाई होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.