शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची परवड...!

By admin | Updated: March 23, 2015 00:45 IST

तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत.

राजापूर : पंचायत समिती शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ आणि शहरातील विश्वनाथ विद्यालयातील केंद्र संचालकांच्या गलथान कारभाराचा फटका रविवारी या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांना बसला. या परीक्षा केंद्रावर निम्म्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बेंचवर, तर उर्वरित विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जमिनीवर करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.याप्रकरणी पंचायत समिती सदस्या व माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही या प्रश्नी शिक्षण विभागाला आम्ही जाब विचारू, असेही लाड यांनी यावेळी सांगितले.रविवारी, २२ मार्च रोजी राज्यात सर्वत्र चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राजापूर तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत. शहरातील विश्वनाथ विद्यालयात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र असून, या ठिकाणी एकूण १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुयोग्य बैठक व्यवस्थेबाबत कोणतेच नियोजन करण्यात आले नव्हते. ऐनवेळी यातील निम्मे विद्यार्थी बेंचवर, तर निम्मे विद्यार्थी जमिनीवर बसले होते. यातील आठ ते दहा विद्यार्थ्यांना विश्वनाथ विद्यालयाच्या वरील मजल्यावरील जिन्याच्या कोपऱ्यात बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या अशा बेंच व खाली जमिनीवरच्या विसंगत बैठक व्यवस्थेबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी उपस्थित गटशिक्षणाधिकारी प्रकाश ढाले, विस्तार अधिकारी संतोष सोळंकी, केंद्र संचालक रमेश धुळप यांना याचा जाब विचारला. यावेळी बेंचची संख्या अपुरी असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर समोरील गोखले कन्याशाळेत विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथेही पुरेशा बेंच नसल्याने पुन्हा काही मुलांना खाली बसावे लागणार असल्याने व परीक्षेची वेळ जवळ आल्याने मग पालकांनीच सामंजस्याची भूमिका घेत पूर्वी होते तेथेच विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथे बसविण्यात आले व परीक्षा सुरळीत सुरू झाली. जिन्याच्या कोपऱ्यात बसविलेल्या त्या आठ ते दहा विद्यार्थ्यांना मात्र पालकांनी विश्वनाथ विद्यालयाच्या खालील रिकाम्या खोलीत बसविण्याची मागणी केली व ती केंद्रसंचालकांनी मान्य करत त्यांना खालील वर्गात बेंचवर बसविले. काही वर्गात तर प्रकाश व्यवस्थाही पुरेशी नसल्याने पालकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अगोदरच लगतच्या गोखले कन्याशाळा व राजापूर हायस्कूलच्या इमारतीत वर्ग का घेतला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बोर्डाकडून २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग अशा प्रकारे या परीक्षेसाठी नियोजन केले जावे, अशी मागणीही होत आहे.(प्रतिनिधी)विश्वनाथ विद्यालयातील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा असो, एमटीएस परीक्षा असो वा अन्य कोणती परीक्षा असो, बैठक व्यवस्थेबाबत नेहमीच गोंधळ असतो. शिक्षण विभाग आणि केंद्र संचालक याबाबत काहीच दखल घेत नाहीत, अशी कैफियतही अनेक पालकांनी यावेळी मांडली. रविवारी होणाऱ्या या परीक्षेबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांनी अगोदरच योग्य नियोजन का केले नाही? असा सवाल केला जात आहे.