शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृ षी विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 13, 2016 23:48 IST

राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसचे नेतृत्व : कृ षी पदविका विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी

दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही जाचक अटी सरकारने लादल्या आहेत. त्या दूर कराव्या यासाठी दापोलीचे आमदार संजय कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, उपाध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता अजय बिरवटकर यांचे नेतृत्वाखाली दापोली कृषी विद्यापीठावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसने कृ षी विद्यापीठ प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन नियमानुसार कोणत्याही विषयाच्या लेखी अथवा प्रॅक्टिकल पेपरमध्ये प्रत्येकी २२ गुणांसह परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती अधिक आहे.कृषी पदविका अभ्यासक्रम हा कठीण असून, लेखी व प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षांचे गुण मिळून उत्तीर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल लागण्यासाठीही ४५ दिवसांचा कालावधी लागतो. तो निकाल लवकर घोषीत करावा. कृषी तंत्रनिकेतन या ३ वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमाचा निकाल १६ टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थी एका व अर्ध्या गुणांनी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे एका गुणांनी नुकसान झाले आहे. त्यासाठी सप्लीमेंट परीक्षा घ्यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे १ वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना इबीसी स्कॉलरशिप मिळालेली नाही ती तत्काळ मिळावी, आदी मागण्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी केल्या.स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य दिले जावे, तसेच कम्पार्टमेंट पासिंग सुरु करावे, विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्या, नवीन सत्रात शैक्षणिक शुल्कासाठी सवलत देऊन सुलभ हप्त्यामध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी दापोली कृषी विद्यापीठावर हा मोर्चा काढण्यात आला होता.विद्यापीठावर काढलेल्या मोर्चावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, शैलेश कदम, राजेंद्र चौगुले, विजय मुंगशे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)धोरण चुकीचे : कामगारांना न्याय देणारकृ षी विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. विद्यापीठाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. सरकारचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे.- संग्राम कोतेपाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस .दापोली कृ षी विद्यापीठातील अनेक पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून, रोजंदारांचा विषय शासन दरबारी मांडू. पहिल्या टप्प्यातील कामगारांना कायम करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आपण वेळोवेळी आवाज उठविल्यानेच रोजंदारी मजुरांना न्याय मिळाला.-संजय कदम, आमदारआमदार उतरले...विद्यापीठावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार संजय कदमही सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक होता.