शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

By admin | Updated: July 10, 2014 00:29 IST

आंबोली दरीत गिर्यारोहकांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश

आंबोली : आंबोली कावळेशेत येथे सुमारे १८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या विजापूर येथील पवन कुलकर्णी याचा मृतदेह शोधण्यात गिर्यारोहकांना यश आले. मुसळधार पाऊस व दाट धुक्याच्या अडथळ्यावर मात करत सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर, बाबल आल्मेडा टीम, अजिंक्य अ‍ॅडव्हेंचर, शिवदुर्ग मित्रमंडळ, लोणावळा, यशदा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. सोमवारी दुपारी कावळेशेत येथील धबधब्यावरून पाय घसरून कोसळलेल्या पवन कुळकर्णीचा मृतदेह धबधबा कोसळणाऱ्या ठिकाणापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील ओढ्याच्या शेजारी अडकलेल्या स्थितीत आढळून आला. कोल्हापूरच्या व्हाईट आर्मी गिर्यारोहकांनी पुणे व लोणावळा येथून अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या गिर्यारोहकांना पाचारण केले होते. यातील नीलेश चव्हाण व अमोल रणदिवे या दोघांनी धबधब्याच्या शेजारून पंधराशे फूट खाली उतरून दुर्बिणीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध लावला. तोपर्यंत बाबल आल्मेडा यांच्या टीमने नारायण येथील पायवाटेने तब्बल चार तासानंतर घटनास्थळ गाठले. प्रचंड पाऊस व धुक्यामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते. आल्मेडा यांच्या टीमने पवनचा मृतदेह दरीतून वर आणला. त्यानंतर मृतदेह आंबोली प्राथमिक केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या मोहिमेत लाईफ लाईन फॉर नेचर अ‍ॅण्ड ह्युमन बिर्इंग, डिझस्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटी, काडगाव, कोल्हापूर व्हाईट आर्मी सिंधुुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर्सचे डॉ. कलमेश चव्हाण, अभिजीत चव्हाण, अजिंक्य अ‍ॅडव्हेंचर्स सुजित गायकवाड, दिनकर कांबळे, गणेश गिर, महेश मसणे, सचिन गायकवाड, सुरेंद्र शेळके, संतोष शेलार, अमोल रणदिवे, नीलेश चव्हाण, समीर जोशी, आनंद गावडे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता. मृतदेह मिळाल्याचे कळताच पवनच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत केलेला आक्रोश काळीज पिळवटणारा होता. पुणे, लोणावळा तसेच अन्य जिल्ह्यातून आलेल्या गिर्यारोहकांनी शोध मोहिमेसाठी केलेल्या खर्चाची मागणी प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी देण्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)