शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष सुरुच

By admin | Updated: November 28, 2014 23:56 IST

तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरुच : दोन पर्ससीन ट्रॉलर्सच्या मालकांना समज

मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी हाती घेतलेले कारवाईचे सत्र शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते. पारंपरिक मच्छिमारांनी शुक्रवारी तळाशिल समुद्रात मासेमारी करीत असलेल्या दोन पर्ससीन ट्रॉलर्सला पकडून त्यांच्या मालकांना समज दिली. पर्ससीनविरोधी कारवाईत दांडी, धुरीवाडा, तळाशिल या भागातील २५० ते ३०० पारंपरिक मच्छिमार सहभागी झाले होते. अनधिकृत विनापरवाना मासेमारीविरोधात शासनाकडून कारवाईची योग्य पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांच्या नेत्यांनी सांगितले.गेले दोन दिवस निवती व मालवण येथील तीन पर्ससीननेट नौकांवर कारवाई करून त्यांना समज दिल्यानंतर शुक्रवारी पारंपरिक मच्छिमारांनी आपला मोर्चा तळाशिल व आचऱ्याच्या दिशेने वळविला आहे. तळाशिल समुद्रात आज सकाळी काही गोव्याच्या व आचरा येथील काही पर्ससीन ट्रॉलर्स १० वावाच्या आत येऊन समुद्रात मासेमारी करीत असल्याची माहिती पारंपरिक मच्छिमारांना समजली. अनधिकृत पर्ससीन विरोधात कारवाईचे सत्र सुरू असतानाही मासेमारी करीत असलेल्या पर्ससीनला जरब बसावी यासाठी दांडी, धुरीवाडा, तळाशिल येथील सुमारे २०० ते ३०० मच्छिमारांनी समुद्राच्या दिशेने धाव घेतली.मच्छिमारांनी सहा यांत्रिकी नौकांच्या सहाय्याने पर्ससीन ट्रॉलर्सचा पाठलाग केला. यावेळी तळाशिल- तोंडवळी येथील स्वप्नील पराडकर, गोपी तांडेल, विजयश्री तांडेल यांचे दोन पर्ससीननेट ट्रॉलर्स पकडले. यानंतर त्यांना समज देण्यासाठी दांडी येथील चौकचार मंदिरात दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपल्याकडून यापुढे पारंपरिक मच्छिमारांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नसल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना माघारी पाठविण्यात आले. यापुढे अनधिकृत मासेमारी सुरूच राहिली तर यापेक्षाही लढा तीव्र करू, असा इशारा पारंपरिक मच्छिमारांनी दिला. (प्रतिनिधी)किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेटधारक नौका राजरोसपणे अतिक्रमण करीत असताना शासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अनधिकृत मासेमारीला कोणतेही निर्बंध राहिलेले नसून त्यांना शासनाकडून अभय मिळत आहे. पर्ससीन नौकांच्या या अतिक्रमणामुळे पारंपरिक मच्छिमारांचा मासेमारी व्यवसाय बुडत चालला आहे. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे.- छोटू सावजी, अध्यक्ष, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ