शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

गुहागरात कडव्या संघर्षाची लढत अटळ

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.

संकेत गोयथळे - गुहागर -मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघावरुन वाद झाल्याने युती असूनही डॉ. विनय नातू व रामदास कदम एकमेकांविरोधात लढले. यात युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. युतीच्या मतांची बेरीज करता जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल सतरा हजारांनी अधिक होते. मागील पाच वर्षात राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कामगारमंत्री या माध्यमातून सातत्याने मतदारसंघाशी असलेला संपर्क लक्षात घेता भास्कर जाधव विरोधात विनय नातू अशी थेट लढत कडव्या संघर्षाची होईल, असे चित्र आहे.कै. डॉ. तात्या नातू यांच्यानंतर तब्बल चार वेळा विनय नातू यांनी आमदारकी भूषविली. मतदारसंघाच्या फेररचनेत बदल झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा खेड मतदारसंघ गायब झाला. या मतदारसंघातील मोठा भाग गुहागर मतदारसंघाला जोडला गेला. ही जागा शिवसेनेकडे असल्याचे अखेरच्या क्षणी जाहीर केल्याने नाराज विनय नातूंनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून बॅट या निशाणीवर निवडणूक लढवली.युतीच्या मतविभाजनामुळे निवडणूक निकाल नेहमीपेक्षा अनपेक्षित होता. पहिल्यांदाच या मतदारसंघातील शिवसेना व भाजपची नक्की मते किती हे स्पष्ट झाले. ऐनवेळी येऊन प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या रामदास कदम यांनी ४० हजार मते घेऊन सर्वांना अचंबित केले. कारण वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजून दुजाभावाची वागणूक दिली जात होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विनय नातू यांना ३० हजार, तर भास्कर जाधव यांना ५३ हजार मते मिळाली.यावेळी युतीबरोबर भास्कर जाधव यांना सामोरे जाताना मागील निवडणुकीमधील युतीच्या मतांची गोळाबेरीज करताना ७० हजार होते. जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा १७ हजारांनी जास्त आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता हे मताधिक्य तुटल्याचे लक्षात येते. एकमेव गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंना २५०० मतांचे मताधिक्य मिळवून दिले.विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाने खचलेल्या नातू यांनी राजकीय संन्यास घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. रामदास कदम यांनी तर मागील पाच वर्षांत दोनवेळा घेतलेल्या सभा वगळता पुन्हा फिरकलेच नाहीत. याउलट भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद व कामगारमंत्री म्हणून मतदारसंघाशी सातत्यपूर्वक संपर्क ठेवला. गुहागर पंचायत समिती व त्यानंतर गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन विजयी घोडदौड काम ठेवली आहे. आक्रमक शैलीमुळे भास्कर जाधवांवर काही राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा भाजप-सेना किती घेईल, हा प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. मात्र, कदम गट नातू यांना मनापासून सहकार्य करेल, याबाबत त्यांना शंका आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रचारक असलेले नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांविरोधात सरळ सरळ दंड थोपटले आहेत. काँग्रेसची मते अन्य ठिकाणी फिरवण्यात त्यांना यश येईल का? जाधव यांचे अन्य कट्टर राजकीय विरोधक रमेश कदम यांना लोकसभेला गुहागरमधून आठ हजार मते मिळाली. ही मते कदम अन्य ठिकाणी वळवतील, असेही बोलले जात आहे.यातूनच भास्कर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत विविध पदांवरून विकासकामांच्या जोरावर युतीचे मताधिक्य तोडता येईल, एवढी ताकद निर्माण करताना अंतर्गत शत्रूही मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. अशा स्थितीत युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.