शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कडक कारवाई करावी

By admin | Updated: June 19, 2017 00:37 IST

बांदा-देऊळवाडीतील महिलांचे निवेदन : इतर संशयितांना तत्काळ अटक करा

बांदा : बांदा-देऊळवाडी येथील किशोरी सावंत यांच्या खुनातील मुख्य संशयित बाबा खान याला पोलिसांनी अटक केली असली तरी देऊळवाडी येथील महिला अजूनही दहशतीखाली आहेत. येथील महिला व ग्रामस्थांनी बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हे निदर्शनास आणून दिले. तसेच याप्रकरणात अन्य आरोपींना लवकरात लवकर अटक करा व नि:पक्षपाती या प्रकरणाचा तपास करून दोषी आरोपींना कडक शिक्षा होईल, अशी केस उभी करा अशी मागणी बांदा-देऊळवाडी येथील महिलांनी पोलिसांकडे केली. तसेच या प्रकरणाचा बांदा पोलिसांनी तत्काळ तपास करून मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक केल्याबद्दल बांदा पोलिसांचे अभिनंदनही केले. बांदा-देऊळवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी रविवारी बांदा पोलीस स्थानकावर धडक देत पोलीस निरीक्षक यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रकरणामुळे आजही येथील महिला दहशतीखाली आहेत. देऊळवाडी येथील हा रस्ता निर्मनुष्य आहे. येथील महिला सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी जात असतात. तसेच अजूनही काही घरांमध्ये शौचालये नसल्याने याच माळरानावर महिला जात असतात. तसेच बाजारातून संध्याकाळच्यावेळी महिला आपल्या घरी याच रस्त्याने जात असतात. हे प्रकरण घडल्यापासून सकाळी व सायंकाळी येथील महिला घराबाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे मुख्य संशयित बाबा खान याच्याविरोधात भक्कम अशी केस तयार करा. यासाठी लागणारे सर्व सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाही देऊळवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. बाबा खान याच्याबरोबरच अन्य काहींचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचा दाट संशय या महिलांनी व्यक्त केला. महिलावर्गातील ही भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी या निर्जन ठिकाणी गस्त घालावी. तसेच या माळरानावर काही व्यक्ती दारू पिण्यासाठी व इतर अवैध धंदे करण्यासाठी येत असतात. त्यासाठी या परिसरात नियमित तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी काही महिलांनी अटकेत असलेल्या बाबा खान याला या माळरानावर संशयास्पदरित्या फिरताना कित्येकवेळा पाहिल्याचे सांगितले. तसे आम्ही लिहून देण्यास तयार असल्याचीही सहमती दर्शविली. या घटनेमुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांची माहितीही पोलिसांनी करून घ्यावी असेही काही महिलांनी सांगितले. बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले की, या खून प्रकरणातील मुख्य संशयित बाबा खान याला अटक करण्यात आली असली तरी आमचा तपास सुरुच आहे. या खून प्रकरणात त्याला आणखी कोणी मदत केली आहे का? त्याचे कोणाकोणाशी संपर्क होते? हा खून केवळ एकाच कारणासाठी झाला आहे का? याची माहिती त्याच्याकडून मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे. पण बाबा खान हा अट्टल गुन्हेगाराप्रमाणे आपले तोंड उघडत नसून तो कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आमचा संशय असल्याचे कळेकर यांनी ग्रामस्थांना सांगितले. दरम्यान, काही ग्रामस्थांनी या खून प्रकरणात बाहेरील काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. बाबा खान याचे अवैध धंदे करणाऱ्यांशी संबंध असून अनेकवेळा स्थानिकांनी बाबा खान याला नजीकच्या गोवा राज्यातील काही लोकांबरोबर पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच या माळरानावर ओल्या पार्ट्या कायमच होत असतात. याकडेही पोलिसांचे लक्ष वेधले. यावेळी रिना मोरजकर, निकिता मोरजकर, गजानन गायतोंडे, उमांगी मयेकर, रेश्मा सावंत, रमावती बांदेकर, आदिती सावंत, सुचिता मुळीक, सोनाली धारगळकर, सुगंधा कोरगांवकर, शिल्पा म्हाडगुत, सुवर्णा सावंत, स्नेहल राऊळ, सुषमा मुळ्ये, सुप्रिया धुरी, ऐश्वर्या सुपल, वृषाली मुळ्ये, वैशाली धुरी, राजश्री परब, जयश्री मुळ्ये, पल्लवी गवंडी, राजश्री टेंडले, दिगंबर गायतोंडे, संगीता म्हाडगुत, गीतांजली साळगावकर, आरती चव्हाण, अक्षय मयेकर, लक्ष्मी धुरी, राजश्री तारी, अमिता तारी, अनुजा तारी, परिमल सावंत, साईनाथ धारगळकर, निलेश मोरजकर, बबन धुरी, संदीप शेगडे, सुधीर साटेलकर, जगत बोगटी, महादेव शेगडे, दत्तप्रसाद गवंडे, युवराज वाळके, समीर सावंत, विनायक सावंत, राजन मुळ्ये, संदेश शेगडे, शांबा सावंत, नितीन धुरी, प्रथमेश साटेलकर, गोकुलदास साळगांवकर, प्रमोद धुरी, मनोज रेडकर, स्नेहल सुफल, आकाश सावंत, आशू सावंत, गौरव सावंत, अजय तारी, प्रसाद तारी, काका मुळ्ये, गौरांक साळगावकर, विना वडेर, जयेश म्हाडगुत, जावेद खतीब, दर्पण आळवे, सचिन नाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.