शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अग्निशमन दलास आधुनिक यंत्रणेचे बळ

By admin | Updated: June 12, 2016 23:32 IST

आपत्तीशी लढण्यास सज्ज : पालिकेच्या सहाही विभागांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

अझहर शेख  नाशिकपूर, भूकंप, इमारत, घर, वाडे कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, शॉर्टसर्किट व अपघातांचे प्रमाण वाढणे अशा एक ना अनेक आपत्तींची भीती पावसाळ्यात अधिक वाढते. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा कृती आराखडा अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला असून, पालिकेच्या सहाही विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींशी दोन हात करण्यासाठी अग्निशमन विभागाचे अपुरे मनुष्यबळ अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारावर सज्ज झाले आहे. ‘अग्निशमन’च्या ताफ्यात सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर आलेला अत्याधुनिक ‘हॅजमॅट रेस्क्यू बंब’ हा अग्निशमन दलासाठी मोठा आधार आहे. शहर व परिसरातून गोदावरी, दारणा व नंदिनी (नासर्डी) या मुख्य नद्या वाहतात. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होते. म्हणून नद्यांच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे नद्यांचा जलस्तर वाढतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. या पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहे. महापालिकेच्या पूर्व, पंचवटी, पश्चिम, सातपूर, सिडको, नाशिकरोड अशा सहाही विभागांना पावसाळापूर्व उपाययोजना व कृती आराखडा अग्निशमन विभागाने पाठविला आहे. आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्तांपासून तर थेट सर्वच विभागांच्या खातेनिहाय कामांचे वाटप करण्यात आले आहे. यानुसार महापालिकेच्या सहाही विभागांच्या विभागीय अधिकाऱ्यांनी भूयारी गटार, सार्वजनिक बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, उद्यान आदि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे निश्चित के ली आहेत. एकूणच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन तयार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अग्निशमन विभाग विविध यंत्रसामुग्रीने सज्ज झाला आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. संपूर्ण शहरात मुख्यालयासह उपकार्यालयांचे मिळून सात अधिकारी, ९८ फायरमन, लिडिंग फायरमन, २७ वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. पाण्याच्या बंबांच्या संख्येनुसार वाहनचालकांची संख्याही कमी आहे. १९९९ सालापासून अग्निशमन विभागात वाहनचालक किंवा फायरमन पदासाठी भरती झाली नसल्यामुळे सध्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन जरी यंत्रसामुग्रीने सुसज्ज असले तरी मनुष्यबळाने अपुरे आहे.