चौके : गेले काही दिवस मुसळधार पावसाबरोबरच अतिशय वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा फटका आज गुरुवारी आंबडोस गावाला बसला आहे.मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथे गुरूवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे जुनाट आंब्याचे झाड विद्युत खांबावर उन्मळून पडले. त्यावेळी त्या परिसरातील सात विद्युतखांब या झटक्याने मोडून पडले. तसेच विद्युततारा तुटल्याने वीजवितरणचे फार मोठे नुकसान झाले. सुदैवाने विद्युतपुरवठा वेळीच खंडीत केल्यामुळे आणखी अनर्थ टळला. परंतु सात खांब कोसळल्यामुळे सुमारे १५ ते २० घरांचा वीतपुरवठा खंडीत झाला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी किमान दोन दिवस तरी जातील. तोपर्यंत येथील रहिवाशांना अंधारात रहावे लागणार आहे. या वादळी वाऱ्याचा फटका इतर गावांनाही काही प्रमाणात बसला आहे. (वार्ताहर)
आंबडोसला वादळाचा फटका
By admin | Updated: July 17, 2014 23:09 IST