शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची लुबाडणूक थांबवा

By admin | Updated: January 23, 2015 23:38 IST

प्रसाद गावडे : धनादेश वाटपाबाबत दिशाभूल करणाऱ्या संघटनेवर कारवाई करा

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदीत जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना परजिल्ह्यातील निवारा बांधकाम कामगार संघटनेने विविध लाभाचे पाच लाख रुपयांचे धनादेश वाटप केल्याच्या खोट्या बातम्या देऊन कामगारांची दिशाभूल केली आहे. या संघटनेने केवळ एक लाख आठ हजार रकमेचे धनादेश वाटप केले असून, कामगारांची लुबाडणूक करणाऱ्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.परजिल्ह्यातील निवारा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील कामगारांना खोटी माहिती देऊन आमिषे दाखवत असल्याचा आरोपही स्वाभिमानी कामगार संघटनेने केला आहे. कामगारांना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित केल्याची खोटी बातमी निवारा बांधकाम कामगार संघटनेने देऊन कामगारांची दिशाभूल केली आहे. केवळ आणि केवळ कामगारांना लुबाडण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. प्रत्यक्षात या संघटनेने ३५ हजार रकमेचा एक धनादेश, १० हजारांचे दोन, २५ हजारांचा एक, १५ हजारांचा एक, पाच हजारांचे दोन आणि ३०५० रकमेचा एक असे एकूण एक लाख आठ हजार रुपयांचे धनादेश कामगारांना वितरित करण्यात आले. मात्र, प्रसिद्धी देताना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित केल्याची खोटी माहिती या संघटनेने दिली आहे. कामगारांची दिशाभूल करणारी बाब असून, या संघटनेचा निव्वळ मूर्खपणाच असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)निवारा बांधकाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करानिवारा बांधकाम संघटनेच्या परजिल्ह्यातील स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या अशा खोट्या बातम्यांवर बांधकाम कामगारांनी विश्वास न ठेवता त्यांच्या आमिषांना बळी पडू नये. तसेच या दिशाभूल करणाऱ्या संघटनेची जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी वेळीच दखल घेत संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गावडे यांनी केली आहे. १५९ कामगारांना आठ लाखांची मदत मंजूरभारतीय मजदूर संघ व स्वाभिमानी कामगार संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५९ कामगारांना सुमारे आठ लाख एवढी लाभार्थी रक्कम मंजूर झाली असून, या धनादेशाचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे.