शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शिवसेनेचा रास्ता रोको

By admin | Updated: June 10, 2017 00:22 IST

कणकवलीत शिवसेनेचा रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कणकवलीतील पटवर्धन चौकात शुक्रवारी ११.३0 च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३0 शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीतून पोलिस स्थानकात नेले. यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कर्जमाफी बळिराजाची जबाबदारी सरकारची, शेतकऱ्यांंना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणा देत शिवसैनिक मुंबई-गोवा महामार्गावरून पटवर्धन चौकात दाखल झाले. कणकवलीतील शिवसेना शाखेपासून शिवसैनिकांनी मोर्चा काढून शेतकऱ्यांप्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक शिवसैनिकांच्या हातात घोषणांचे फलक होते. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.यावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शाखेपासून महामार्गावरून मोर्चा काढून पटवर्धन चौकात ठिय्या आंदोलन केले. बंदोबस्तासाठी जलद कृती दलाची तुकडी मागवण्यात आली होती.सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे सकाळी १0 वाजल्यापासूनच पोलीस पटवर्धन चौकात दाखल झाले. काही पोलीस मोर्चासोबत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले. पटवर्धन चौकात महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. महामार्गावर ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवून पोलीस स्थानकात नेले व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी महामार्गावर ठिय्या मांडलेले आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नारायण भिसे, राजू राठोड, हर्षद गावडे, राजेंद्र शेट्ये, शांताराम राणे, डॉ. तुळशीराम रावराणे, फय्याज महम्मद खान, मनोहर गुरव, दीपक राऊत, समीर परब, रिमेश चव्हाण, सतीश परब, चंद्रकांत परब, रूपेश आमडोस्कर, अरविंद राणे, हरिश्चंद्र कांदळकर, प्रथमेश परब, अनिल सावंत, जितेंद्र कांबळे, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडोलकर, तेजल लिंग्रज, प्रतीक्षा साटम, संजना कोलते, वैभवी पाटकर, श्यामल म्हाडगूत, संजीवनी पवार आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून समज देऊन सोडून देण्यात आले.