शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

पोलीस प्रशासनाला इशारा : कणकवलीतील व्यापाऱ्यांचे निवेदन

कणकवली : घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून करण्यात येणारी दडपशाही तातडीने थांबविण्यात यावी. पोलीस तपासाच्या अयोग्य प्रक्रियेमुळे व्यावसायिकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण होत असून ते तत्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा कणकवलीतील व्यापाऱ्यांनी हॉटेल साई पॅलेस येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विशाल कामत, सचिव बाबू वळंजू, बंडु खोत, सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीपाद तोडणकर, गुरू मठकर, दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीचे सल्लागार डॉ. विनय शिरोडकर, दादा बेलवलकर, सुवर्णकार धनंजय कसवणकर यांच्या पत्नी शिवानी कसवणकर, माजी आमदार राजन तेली यांच्यासह अन्य सुवर्णकार व व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांकडून दडपशाही थांबवून न्याय मिळाला नाही तर सुवर्णकारांच्यावतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. व्यापाऱ्यांचा त्याला पाठिंबा असेल. सुवर्णकार हे व्यापार करताना अनेकवेळा सोने खरेदी करीत असतात. सोने चोरीप्रकरणी पोलीस जेव्हा सुवर्णकाराकडे चौकशीसाठी येतात, तेव्हा सुवर्णकारास चोराचा साथीदार म्हणून वागणूक दिली जाते. हे अयोग्य आहे. पोलीस तपासात सुवर्णकाराची साक्षीदार म्हणून चौकशी करून जबानी नोंदवून घेण्यात यावी. सुवर्णकारी हा प्रतिष्ठीत व्यवसाय असून पोलिसांनी सुवर्णकारांना चांगली वागणूक द्यावी. जप्त केलेल्या ऐवजाची रितसर सहीशिक्क्याने पंचासमक्ष पोचपावती पोलिसांनी सुवर्णकाराला द्यावी. विनाकारण सुवर्णकाराची बदनामी, मानहानी व व्यावसायिक नुकसान होणार नाही याबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीच्यावतीने निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली  आहे. (वार्ताहर)काळजी घ्याविनाकारण सुवर्णकाराची बदनामी, मानहानी व व्यावसायिक नुकसान होणार नाही याबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी दैवज्ञ हितवर्धक समाजाच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.