शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: January 10, 2016 00:09 IST

नारायण राणे : युती सरकारमुळे कोकणाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप

कणकवली : सध्याच्या शासनाने कोकण विशेषत: सिंधुदुर्गाबद्दल आकसाचे राजकारण करून विकास ठप्प केला आहे. सिंधुदुर्गातील मासेमारी, गौणखनिज, पर्यटन, आदी व्यवसायात सरकार विनाकारण हस्तक्षेप करीत असून, छळवणूक करीत आहे. ही दडपशाही थांबवावी, अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आमदार नीतेश राणे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. युती शासन रोजगार तर उपलब्ध करून देत नाही, तसेच असलेल्या रोजगारावर टाच आणत आहे. पर्यटनावर उदरनिर्वाह करीत असलेल्या देवबाग, तारकर्ली येथील व्यवसाय अनधिकृत ठरवून जोरदार कारवाई सुरू केली आहे. परराज्यांतील ट्रॉलर नियम धाब्यावर बसवत असल्याने स्थानिक मासळीपासून वंचित राहत आहेत. परप्रांतीयांविरोधात गस्तीनौकांचा वापर न करता स्थानिक मच्छिमारांवर प्रशासन दडपशाही करीत आहे. कोकणाला मिळणाऱ्या सवलती रोखण्यात येत आहेत. स्थानिक शिक्षक भरती होत नसून, अतिरिक्त ठरवून शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात येत आहे. पाटबंधारे प्रकल्प, विमानतळ, सी-वर्ल्ड, दोडामार्ग एमआयडीसी, रेडी बंदर प्रकल्प बंद आहेत. पालकमंत्री, खासदार आणि सत्ताधारी आमदारांचे अधिकाऱ्यांसमोर काही चालत नाही. समस्यांची जाण नसल्याने नुसता पोरखेळ सुरू आहे. रिकाम्या डंपरवर एक लाखाचा दंड ठोठाविण्याचे प्रकार झाले. जास्तीत जास्त दंडाऐवजी किमान दंड आकारता येऊ शकतो. यामुळे येथील तरुणांचे व्यवसाय उद्ध्वस्त होत असून, प्रशासनाविरोधात जनतेचा एकदिवशी प्रक्षोभ होईल. जिल्ह्यातील उलाढाल ठप्प झाली असून, व्यापारी वर्ग त्रस्त आहे. जिल्हा अधोगतीकडे चालला आहे. सरकारने आकस सोडून बंद प्रकल्प सुरू करावेत, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी) पारकर यांना कॉँग्रेसमध्ये नो इंट्री संदेश पारकर यांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. पारकर आणि कॉँग्रेसचा आता कोणताही संबंध नाही. जिल्ह्यात त्यांचे कोणतेही अस्तित्व राहणार नाही. कोणत्याही वरिष्ठ नेत्याला पारकर भेटत असले तरी माझ्या मनाविरुद्ध कॉँग्रेसमध्ये त्यांना कोणी घेणार नाही. पारकर यांचा वापर कसा केला? उलट त्यांना मी लाल दिवा दिला. त्यांच्या कारकिर्दीत कॉँग्रेसचे आमदार, खासदार पडले. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यास स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. आरोग्यमंत्र्यांचे नाचता येईना अंगण वाकडे सिंधुदुर्गात डॉक्टर येत नसल्याने विरोधक टीका करतात तर त्यांनी डॉक्टर टिकविण्याचा फॉर्म्युला द्यावा, असे सांगणाऱ्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना फॉर्म्युला देतो. मंत्री असूनही डॉक्टर टिकविणे सावंत यांना समजत नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’, अशी त्यांची स्थिती आहे, अशी टीका राणे यांनी केली. मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळी विधाने करण्यापेक्षा योग्य माहिती घेऊन बोलावे. रेडिरेकनरच्या चौपट मोबदला द्यावा लागणार असून, मोबदला मिळाल्याशिवाय कोणतेही काम होऊ देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. साहित्याला राजकारणाचा वास नको साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीकांत सबनीस यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत नारायण राणे म्हणाले की, साहित्य संमेलनाला राजकारणाचा वास लागू नये. सबनिसांनी पंतप्रधान मोदी असोत की अन्य कोणी, राजकारणाविषयी टिप्पणी करू नये, असे राणे म्हणाले.