शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या साकवांची कामे थांबवा

By admin | Updated: February 12, 2015 00:36 IST

उपोषणाचा इशारा : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना शिवसेनेने जाब विचारला

कणकवली : तालुक्यात विशेष घटक योजनेंतर्गत दलितवस्तीमध्ये साकवाची कामे मंजूर झाली आहेत, परंतु आवश्यक असलेल्या ठिकाणी साकवाचे बांधकाम न होता अन्य ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या साकवाचा फायदा दलितवस्तीतील नागरिकांना होणार नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी सुरू असलेली साकवाची बांधकामे तत्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा दलितवस्तीतील लोकांना एकत्र करून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना दिला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना तालुक्यातील विविध कामांबद्दल जाब विचारला. उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, रिमेश चव्हाण, अजित काणेकर, बाळा येळूरकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष घटक योजनेंतर्गत तालुक्यातील दलितवस्तीमध्ये साकव बांधण्याचे १७ कामे मंजूर झाली आहेत. ही कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आली. हा ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असून दलित वस्तीमधील लोकांना कोणताही फायदा होणार नाही, असे दिसून येत आहे. जानवली-बौद्धवाडी येथील साकव बौद्धवाडीला जोडला जातो का याची खात्री करा. संबंधित वाडीमध्ये साकवाची आवश्यकता आहे का याचा खुलासा करण्यात यावा. ही कामे तत्काळ थांबवण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठेकेदारास सदर कामाचे देयक देण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली. आचरा बायपास मार्गाचे काम झालेले नसताना ४० लाख रूपये ठेकेदाराला कसे काय अदा करण्यात आले? असा प्रश्न राजू राठोड यांनी केला. नेमकी वस्तुस्थिती माहिती करून घेऊ, असे छाया नाईक यांनी सांगितले. महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. रस्त्यालगत आता सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम मंजूर करू नये, अशी विनंती सचिन सावंत यांनी केली. (प्रतिनिधी) कामाची पाहणी करावीसार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कामाचे रजिस्टर व बिल बुकाच्या यादीची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यानुसार छाया नाईक यांनी यादी देण्याचे मान्य केले. फोंडाघाट येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.