शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कदम, बने ‘शिवबंधनात’

By admin | Updated: August 25, 2014 23:25 IST

‘मातोश्री’वर झाला पक्षप्रवेश : उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

देवरुख : माजी आमदार आणि कट्टर राणे समर्थक असलेले गणपत कदम आणि सुभाष बने यांनी अखेर स्वत:ला शिवबंधनात बद्ध करून घेतले. ‘मातोश्री’वर आज, सोमवारी झालेल्या एका छोटेखानी समारंभात या दोघांनीही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेना सोडून सुभाष बने आणि गणपत कदम यांनी २00५मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र काँग्रेसमध्ये पद नाहीच, उलट मानसन्मानही मिळत नसल्याचे या दोन्ही माजी आमदारांनी त्यांची नाराजी प्रगट करताना म्हटले होते. हे दोन्ही माजी आमदार कोणत्या पक्षात जाणार याबाबत कुतूहल होते. ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे आणि शिवसेनेतच प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वांत अगोदर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आज, सोमवारी ‘मातोश्री’ येथे या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही शिवबंधनात बद्ध केले आणि सुभाष बने यांनी भगवा ध्वज हातात धरला. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मुंबई कामगार सेनेचे उपाध्यक्ष सुनील चिटणीस, माजी महापौर दत्ता दळवी, नगरसेवक रमेश कोरगावकर, बेस्टचे माजी अध्यक्ष अशोक पाटील, पराग विद्यालयाचे संस्थापक बाळकृ ष्ण बने, पराग बने, रोहन बने, लांजा तालुकाध्यक्ष संदीप दळवी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)समर्थकहीकाँग्रेस सोडणारकाँग्रेसमध्ये निराशा झाल्यानंतर बने आणि कदम यांचे समर्थक कार्यकर्तेही काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त आहे. हे दोन्ही माजी आमदार मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत असून, त्यानंतर ते समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर झालेल्या कार्यक्रमात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही शिवबंधनात बद्ध केले.