शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्सनेट’विरोधात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: December 15, 2015 23:36 IST

कारवाईची मागणी : शिवसेना आमदार आक्रमक

मालवण : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार पर्ससीननेट मासेमारीविरोधात आक्रमक झाले. ‘पर्ससीननेट हटवा, पारंपरिक मच्छिमार जगवा’ ‘पर्ससीन नेट हटवा, सागरी पर्यावरण वाचवा’ अशा घोषणा देत शिवसेना आमदारांनी नागपूर अधिवेशन सभागृह पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. सरकार पर्ससीननेट मासेमारीसंदर्भात ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी घेतला. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कर्नाटक, गोवा, गुजरात आणि केरळ राज्यातील पर्ससीन नेट ट्रॉलर्स आणि हायस्पीड ट्रॉलर्स घुसून मत्स्यधनाची लयलूट करीत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत पर्ससीन नेट नौका पारंपरिक मच्छिमारांच्या हद्दीत येऊन अगदी किनाऱ्यालगत मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष तीव्र बनला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक, प्रकाश आबीटकर, तृप्ती सावंत, मनोहर भोईर, मंदाताई म्हात्रे, संजय कदम आदींनी अधिवेशन सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. (प्रतिनिधी)सागरी अधिनियम अंमलबजावणीसाठी अडीच कोटी---दरम्यान, सोमवारी आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला असता महाराष्ट्र राज्य सागरी अधिनियम १९८१च्या अंमलबजावणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याचे उत्तर देण्यात आले. पर्ससीन नेटसंदर्भात पुन्हा सभागृहात चर्चा केली जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.