शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आवळेगावात राज्य-जिल्हास्तरीय स्पर्धा

By admin | Updated: March 18, 2017 21:00 IST

कदम फाऊंडेशन व ‘शब्दवेल’तर्फे आयोजन : १४ एप्रिलपासून होणार सुरुवात

कडावल : आवळेगाव येथे १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत विविध जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोफत आरोग्य शिबिर व जिल्ह्यातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सतीश कदम फाऊंडेशन व शब्दवेल प्रकाशनतर्फे करण्यात आले असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवार १४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक ३००० रुपये, द्वितीय क्रमांक २००० रुपये व तृतीय क्रमांकास १००० रुपये पारितोषिक आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.शनिवार २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या प्रथम क्रमांकास ७००० रुपये, द्वितीय क्रमांकास ५००० रुपये, तृतीय क्रमांकास ३००० रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. शनिवार ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांस प्रथम क्रमांकास ७००० रुपये, द्वितीय क्रमांकास ५००० रुपये व तृतीय क्रमांकास ३००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत. सोमवार १ मे २०१७ रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास ३००० रुपये, द्वितीय क्रमांकास २००० रुपये व तृतीय क्रमांकास १००० रुपये व चषक देण्यात येणार असून इतरही उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच देणगीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक सतीश कदम यांनी केले आहे. (वार्ताहर) विशेषांकाचे प्रकाशनया कार्यक्रमांतर्गत पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार असून यावेळी ‘सिंधुसाफल्य’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.