सावंतवाडी : २०१३-१४ चा राज्यस्तरीय संशोधन वनक्षेत्र पुरस्कार दोडामार्गचे प्रमोद प्रकाश सावंत यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वन व वन्यजीव संरक्षण व वनसंवर्धनाच्या प्रभावी व उत्कृष्ट कार्याबद्दल संशोधन वनविभाग पुणे यांच्यावतीने दिला जातो.यशदा पुणे येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनराज्यमंत्री अत्राम, राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे महापौर, आमदार, खासदार आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर वनसचिव महाराष्ट्र राज्य आदी होते. सावंत यांच्या रूपाने जिल्ह्याला हा मान प्रथमच प्राप्त झाला आहे. या पुरस्कारासाठी सेवेतील मागील पाच वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेतली जाते. पुरस्कार निवडीसाठी राज्य पातळीवरील सचिव वने, वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडली जाते. सुमारे २८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांतून दरवर्षी २५ ते २६ लोकांची निवड करण्यात येते. प्रमोद सावंत यांनी २००२ मध्ये वनरक्षक प्रशिक्षण महाविद्यालय शहापूर येथे राज्यस्तरीय सुवर्णपदक प्राप्त केले होते. सावंत यांचा वनविभागाला अभिमान राहील, असे सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी सांगितले. (वार्ताहर)
सावंत यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
By admin | Updated: August 24, 2016 23:43 IST