शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य ‘हॉट’, कोकण ‘कूल’ पर्यटन हंगाम होणार फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:27 IST

मनोज मुळ््ये । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असली ...

मनोज मुळ््ये ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असली तरी त्या तुलनेत कोकण अजून कूल आहे. त्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. कोकणाबाहेरील जिल्ह्यांचे तापमान ४0 अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांसाठी कोकणातील वातावरण थंड आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानातही कोकणातील पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. एका अर्थाने तीव्र उन्हाचा त्रास सहन करणाऱ्यांना कोकणातील हवामानाकडून पर्यटनाचे निमंत्रणच दिले जात आहे.परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा हंगाम लगेचच सुरू होतो. यावेळी मात्र निवडणुका असल्यामुळे हा हंगाम काहीसा लांबला आहे. १३, १८, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यातील तीन टप्पे पूर्ण झाले आहेत आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुका सोमवार २९ रोजी होत आहेत. निवडणुकांमुळे बहुतांश सरकारी कर्मचारी कामातच अडकून पडले आहेत. मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुरू झाल्या तरी पर्यटकांचे आगमन झालेले नाही. हॉटेल व्यावसायिकांकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुकींगबाबत तसेच १५ मे नंतरच्या बुकींगबाबत राज्यभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे या दोन टप्प्यांवर पर्यटकांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर सध्या ३५ ते ३८ अंश इतके तापमान झाले आहे. कोकणच्या दृष्टीने पारा भडकलेलाच आहे. कोकणासाठी हे तापमान अधिक आहे. मात्र, महाराष्ट्रात इतर अनेक जिल्ह्यात पारा ४0 ते ४२ अंशापुढे गेला आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीतील तापमान कमीच आहे.आताच्या दिवसात समुद्राकडून वाहणारे वारे या उन्हाची तीव्रता काहीशी कमी करतात. त्यामुळे कोकण अजून इतरांच्या मानाने थंड आहे.राज्यातील पर्यटकच अधिकसर्वसाधारणपणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येणाºया पर्यटकांपैकी ७५ टक्के लोक महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतूनच येतात. उर्वरित लोक राज्याबाहेरील असतात. कोकणात येणाºया पर्यटकांमध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधील लोकांचेच प्रमाण अधिक असल्याने आणि तेथील तापमान कोकणापेक्षा अधिक असल्याने त्यांची पावले कोकणाकडे वळतील, असे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना अपेक्षित आहे.