शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी पर्यटन मेळा

By admin | Updated: September 28, 2016 00:43 IST

एकनाथ नाडकर्णी : ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे आयोजन

कुडाळ : जिल्हा परिषदेच्यावतीने ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत कुडाळ नवीन एस.टी. डेपो येथे राज्यस्तरीय कृषी औद्योगिक पशुपक्षी व पर्यटन मेळा आयोजित केला आहे. जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, दुग्ध व्यावसायिक, पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार यांना कृषी व पशुपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान, विकसित यंत्रसामग्री यांचे ज्ञान मिळावे, तसेच जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्त्व कळावे, कृषी व पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी प्रवृत्त करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी या मेळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिली.या मेळ्याविषयी माहिती देण्यासंदर्भात कुडाळ पंचायत समिती येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी पशुसंवर्धन सभापती एकनाथ नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, तसेच कृषी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नाडकर्णी म्हणाले, माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या संकल्पनेतून हा मेळा गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येत असून, याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या मेळ्यात पशुपक्षी प्रदर्शन, कृषिविषयक, दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण, कृषी, दुग्ध व्यवसाय व पर्यटनविषयक स्टॉल असणार आहेत. तसेच या क्षेत्राविषयी विविध तज्ज्ञांची चर्चासत्रे, स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पशुपक्ष्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.रणजित देसाई म्हणाले, हा जिल्हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन क्षेत्रातही वाढ झाली पाहिजे, हा उद्देश आमचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आहे. पर्यटनवाढीसाठी मागील वर्षापासून या मेळ्यात पर्यटन विभागाचाही समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर, बीड, उस्मानाबाद तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतून व कर्नाटक, गोवा या राज्यांतूनही या मेळ्यात विविध जातीची संकरित देशी जनावरे आणण्यात येणार आहेत. यावर्षी तांदूळ महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मेळ्याच्या पहिल्या दिवशी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केल्याचे देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोकणातील मोठे प्रदर्शन : देसाईहा कृषी, दुग्ध व्यवसाय, तसेच पर्यटनविषयी मेळा आणि प्रदर्शन हे कोकणातील सर्वांत मोठे प्रदर्शन ठरले आहे. या मेळ्याचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे, असे रणजित देसाई यांनी सांगितले. प्रदर्शनातील जनावर खरेदीला तत्काळ कर्जमंजुरीजिल्हा परिषदेच्या सहकार्याने प्रदर्शन कालावधीत खरेदी करण्यात येणाऱ्या जनावरांना तत्काळ कर्ज मंजुरी देण्यात येणार आहे, अशी माहिती रणजित देसाई व एकनाथ नाडकर्णी यांनी दिली.